आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Drugs Party On Cruise: Aryan Khan Went On A Cruise With The Son Of A Big Businessman, Daughter Of A Big Actor Was Also Present In The Party

क्रूझ ड्रग्ज पार्टीची इनसाइड स्टोरी:शाहरुखच्या मुलासोबत हजर होती एका बड्या अभिनेत्याची मुलगी, हायप्रोफाईल लोकांनी अंर्तवस्त्रांमध्ये लपवून नेले होते ड्रग्ज; 80 हजारांपासून ते 5 लाखांपर्यंत होती एंट्री फी

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आर्यनच्या अटकेनंतर एक सेल्फी समोर आला होता. यामध्ये आर्यनसोबत सेल्फी घेणारी व्यक्ती ही एनसीबीचा अधिकारी असल्याचे म्हटले गेले होते. मात्र फोटोत जी व्यक्ती दिसत आहे ती व्यक्ती एनसीबीची अधिकारी किंवा कर्मचारी नसल्याचे स्पष्टीकरण एनसीबीकडून देण्यात आले आहे.

एनसीबीने शनिवारी मुंबईजवळील कॉर्डिएला द इम्प्रेस या क्रूझवर छापा टाकला होता, त्या पार्टीमध्ये सुमारे 600 हायप्रोफाइल लोक उपस्थित होते. माध्यमांच्या वृत्तानुसार, शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह 8 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे, ज्यात 3 मुलींचा समावेश आहे. या पार्टीतून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून त्याची किंमत कोट्यवधींमध्ये आहे. मात्र, एनसीबीने आणखी ज्या लोकांना ताब्यात घेतले, त्यांच्या नावाची पुष्टी झालेली नाही.

क्रूझवर एका बड्या अभिनेत्याची मुलगीही उपस्थित होती
एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मोठ्या अभिनेत्याची मुलगीही क्रूझवर उपस्थित होती. मात्र तिला ताब्यात घेण्यात आले आहे की नाही हे अद्याप समोर आलेले नाही. क्रूझवर अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनही उपस्थित होता. तो रेव्ह पार्टीचा भाग होता की नाही याची एनसीबीने पुष्टी केलेली नाही.

अंडरगार्मेंटमध्ये लपवून नेले होते ड्रग्ज
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रूझवर 600 हून अधिक हायप्रोफाइल लोक हजर होते. या रेव्ह पार्टीमध्ये सामील असलेल्या लोकांनी आपल्या पँटच्या शिलाईमध्ये, महिलांच्या पर्सच्या हँडलमध्ये, अंडरवेअरच्या शिलाईच्या भागामध्ये आणि कॉलरच्या शिलाईमध्ये ड्रग्ज लपवून नेले होते. या पार्टीत सामील झालेल्या आणकी काही लोकांची वैद्यकीय तपासणी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांनी ड्रग्जचे सेवन केल्याची पुष्टी झाल्यानंतर त्यांनाही अटक केली जाऊ शकते.

सध्या एनसीबी या लोकांची चौकशी करत आहे:

1. मुनमुन धामेचा 2. नुपूर सारिका 3. इस्मीत सिंग 4. मोहक जसवाल 5. विक्रांत छोकर 6. गोमित चोप्रा 7. आर्यन खान 8. अरबाज मर्चंट

बिझनेसमनच्या मुलासोबत क्रूझवर गेला होता आर्यन

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन अरबाज नावाच्या व्यक्तीसोबत क्रूझवर गेला होता. आर्यन हा व्हीव्हीआयपी पाहुणा होता, त्यामुळे त्याला प्रवेश शुल्क नव्हते. तर अरबाज हा एका मोठ्या व्यावसायिकाचा मुलगा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एनसीबीला तपासादरम्यान त्याच्या शूजमधून ड्रग्ज सापडले आहेत. मात्र अद्याप याची पुष्टी करण्यात आलेली नाही. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शाहरुखचा मुलगा आर्यनचा मोबाईल जप्त केला आहे.

80 हजारांपासून ते 5 लाखांपर्यंत होती एंट्री फी
क्रूझवर चालणाऱ्या या पार्टीची एंट्री फी 80 हजारांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले जात आहे. या क्रूझची क्षमता सुमारे 2 हजार लोकांची आहे, मात्र येथे फक्त 600 लोक उपस्थित होते. इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून या पार्टीचे आमंत्रण देण्यात आले होते. याशिवाय काही लोकांना आकर्षक किट पाठवूनदेखील आमंत्रित करण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड स्टार शाहरुखचा मुलगा आर्यनने सांगितले की, त्याला पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते आणि पार्टीला उपस्थित राहण्यासाठी त्याने पैसे दिले नाहीत.

हे छायाचित्र क्रूझवरील आहे. यामध्ये आर्यन (डावीकडे) अरबाज नावाच्या व्यक्तीसोबत दिसत आहे. यामध्ये त्यांच्यासोबत एक मुलगीही दिसत आहे.
हे छायाचित्र क्रूझवरील आहे. यामध्ये आर्यन (डावीकडे) अरबाज नावाच्या व्यक्तीसोबत दिसत आहे. यामध्ये त्यांच्यासोबत एक मुलगीही दिसत आहे.

क्रूझ पार्टीत सहभागी झालेले बहुतेक लोक दिल्लीचे
या क्रूझ पार्टीत सहभागी झालेले बहुतेक लोक दिल्लीचे आहेत, जे विमानाने मुंबईला आले आणि नंतर क्रूझवर गेले. समुद्राच्या मध्यभागी चालणाऱ्या ड्रग्ज पार्टीवर एनसीबीचे हे पहिले मोठे ऑपरेशन आहे. सुत्रांनी असेही सांगितले की, क्रूझच्या आत सुरु असलेल्या पार्टीचा एक व्हिडिओ देखील एनसीबीच्या हाती लागली आहे, ज्यामध्ये आर्यन दिसत आहे. पार्टी दरम्यान आर्यनने पांढरा टी-शर्ट, निळा जीन्स, लाल ओपन शर्ट आणि कॅप घातली होती. एनसीबीला ताब्यात घेतेलल्या लोकांकडून रोलिंग पेपर्सही सापडले आहेत.

दिल्लीच्या तीन बड्या उद्योगपतींच्या मुलीही पकडल्या गेल्या
या प्रकरणी दिल्लीहून आलेल्या तीन मुलींनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे. तिघीही जणी बड्या उद्योगपतींच्या मुली असल्याचे सांगितले जात आहे. एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयातून संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवले जात आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हा तपास कायद्याच्या कक्षेतच केला जात आहे. जो दोषी आढळले त्याच्यावर कारवाई केली जाईल. मुंबईचे एक मोठा वकील एका आरोपीची कायदेशीर बाजू मांडत आहे.

इनपुट: निशात शम्सी

बातम्या आणखी आहेत...