आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूड ड्रग्स प्रकरण:बॉलिवूड निर्माता नाडियाडवालाच्या घरातून अंमली पदार्थ जप्त, पत्नी शबाना सईदसह चाैघे जण अटकेत

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ड्रग्ज प्रकरणी ताब्यात घेतलेल्या अनेक संशियांताच्या चौकशीतून नाडियाडवालांचे नाव समोर आले होते

बॉलिवूड निर्माता फिराेज नाडियाडवाला यांच्या घरातून अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) अंमली पदार्थ जप्त केले असून या प्रकरणी त्यांची पत्नी शबाना सईदची चाैकशी करून तिला अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ७१७ ग्रॅम गांजा, ७४.१ ग्रॅम चरस आणि ९५.१ ग्रॅम एमडी तसेच राेकड जप्त करण्यात आली. आता एनसीबी नाडियाडवाला यांना समन्स पाठवण्याच्या तयारीत आहे.

एनसीबीने छापा टाकला त्यावेळी नाडियाडवाला घरी नव्हते. एनसीबीने ७ व ८ नाेव्हेंबरच्या रात्रीपासून अनेक ड्रग पॅडलर्सच्या घरावर धाडी टाकल्या असून आणखी ५ ड्रग पॅडलर्सला ताब्यात घेतले आहे. ड्रग्ज प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या अनेक संशियांताच्या केलेल्या चाैकशीतून नाडियाडवाला यांचे नाव समाेर आले हाेते. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी एनसीबीने धाडी टाकल्या हाेत्या असे सूत्रांनी सांगितले. फिराेज नाडियाडवाला यांनी हेराफेरी, आवारा पागल, दिवाना, वेलकम, कारतूस सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.