आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगनाला आणखी एक नोटीस:शेतक-यांविरोधात कंगना रनोटने टाकली होती सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, गुरुद्वारा समितीने पाठवली कायदेशीर नोटीस

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाद चिघळत चालेला बघून कंगनाने सोशल मीडियावरील आपली पोस्ट डिलीट केली होती.

दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या (DSGMC) एका सदस्याने अभिनेत्री कंगना रनोट हिला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. कंगनाने कृषी कायद्यास विरोध करणा-या शेतक-यांविरोधात सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. घटनेअंतर्गत शांततेत निदर्शने करण्याचा शेतक्यांना देखील हक्क असून ती शेतक-यांचा अपमान करू शकत नाही, असे या नोटिसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

समितीचे सदस्य जस्मैन सिंग नोनी यांच्या वतीने वकील हरप्रीतसिंग होरा यांनी या नोटिशीमध्ये म्हटले आहे, ''जेव्हा कंगनाच्या मुंबईतील कार्यालयाचा काही भाग पाडण्यात आला तेव्हा तिने तिच्या चाहत्यांना एकत्र करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला. त्यावेळी ती म्हणाली होती की, बीएमसीची कारवाई ही तिच्या मूलभूत हक्कांवर हल्ला आहे. त्याचप्रमाणे मूलभूत हक्कांखाली निषेध करण्याचा शेतक-यांना देखील अधिकार आहे.''

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला कारवाई करण्यास सांगितले
वकील हरप्रीत सिंह होरा यांनी नोटीसमध्ये म्हटले आहे की, 'बर्‍याच रिपोर्ट्समध्ये या दोन महिला भिन्न असल्याचा दावा करण्यात आला आहे. आणि जरी त्या वेगळ्या नसल्या तरी आपले राजकारण चमकवण्यासाठी वृद्ध महिलेचा अपमान करण्याचा कंगनाला अधिकार नाही. हे स्पष्टपणे एक द्वेषयुक्त पोस्ट आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने लवकरात लवकर पाऊल उचलण्याची गरज आहे. '

शाहीन बागच्या 'दादी'विषयी केली होती आक्षेपार्ह पोस्ट

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात अनेक वृद्ध शेतकरी आणि त्यांची कुटुंबे सामील झाली आहेत. यात सामील एक वर्षीय वृद्ध महिला, ज्यांना सगळे ‘दादी’ म्हणत आहेत, त्यांच्यावरच कंगनाने टीका केली होती. कंगनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, ‘हा..हा..हा.. या त्याच दादी आहेत, ज्यांना टाईम मॅगझिनने सर्वात शक्तिशाली व्यक्तींमध्ये सामील केले आहे. या आता 100 रुपयांत उपलब्ध आहेत. पाकिस्तानी पत्रकार भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कुप्रसिद्धी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला असे लोक हवे आहेत, जे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्यासाठी आवाज उठवू शकतील.’ या पोस्टनंतर तिच्यावर प्रचंड टीका झाली होती. सदर प्रकार लक्षात आल्यावर कंगनाने आपली पोस्ट डिलीट केली. मात्र, यावर कुठलेही स्पष्टीकरण तिने अद्याप दिलेले नाही. तसेच तिने माफीदेखील मागितली नाही.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser