आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनाच्या विळख्यात डीएसपी:रिया चक्रवर्तीची चौकशी करणारे डीएसपी अभिषेक त्रिमुखेंना कोरोनाची लागण; सीबीआय पथकाचीही होणार कोरोना चाचणी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • त्रिमुखे यांच्यासह त्यांच्या संपुर्ण कुटुंबालाही कोरोनाची लागण झाली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची चौकशी करणारे वांद्रे पोलिस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. त्रिमुखे यांच्यासह त्यांच्या संपुर्ण कुटुंबालाही कोरोनाची लागण झाली आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर रिया आणि त्रिमुखे यांच्यातील कॉल डिटेल समोर आले होते. सुशांतच्या मृत्यूनंतर रियाने अभिषेक यांच्यासोबत फोनवर चर्चा केली होती. चार फोन कॉल्स आणि एका एसएमएसद्वारे या दोघांमध्ये संपर्क झाला होता. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

  • सीबीआयच्या पथकाचीही होणार चाचणी

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला आहे. मात्र हा तपास सुरु असताना त्रिमुखे यांना भेटलेल्या सीबीआय पथकाचीही कोरोना चाचणी होणार आहे.

सीबीआयचे पथक मुंबईत आल्यानंतर त्रिमुखे आणि परमजित सिंह दहिया यांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी भेट घेतली होती. तसेच, सुशांत प्रकरणात स्पष्टीकरणही मागण्यात आले होते, असे सांगितले जात आहे.

  • या काळात झाले होते रिया आणि त्रिमुखे यांच्यात फोनवर संभाषण

एका रिपोर्टमध्ये कॉल डिटेल रेकॉर्ड्सचा हवाला देत दावा करण्यात आला की, रिया चक्रवर्ती वांद्रेचे डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांच्या संपर्कात होती. तिने त्यांना दोनदा फोन केला होता आणि त्रिमुखे यांचा रियाला दोनदा कॉल आला होता. एवढेच नाही तर या दोघांमध्ये मेसेजवरही बोलणे झाले होते. 21 जून ते 18 जुलै दरम्यान रिया चक्रवर्ती आणि अभिषेक त्रिमुखे यांच्यात संभाषण झाले. वृत्तानुसार 21 जून रोजी त्रिमुखे यांनी रियाला फोन केला होता आणि सुमारे 28 सेकंद त्यांच्यात बोलणे झाले होते. यानंतर त्यांनी 22 जून रोजी रियाला मेसेज केला होता. 22 जून रोजी त्रिमुखे आणि रिया यांच्यात 29 सेकंद चर्चा झाली. 8 दिवसांनंतर, त्रिमुखेंनी रियाला फोन केला आणि सुमारे 66 सेकंद त्यांचे बोलणे झाले. 18 जुलै रोजी रियाने डीसीपींना फोन केला होता.

  • मुंबई पोलिसांनी दिले होते स्पष्टीकरण

या संपूर्ण प्रकरणावर मुंबई पोलिसांची प्रतिक्रियाही समोर आली होती. हे फोन कॉल अधिकृत कारणास्तव केले गेले होते, असे मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले होते. रियाला वांद्रे आणि सांताक्रूझ पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलविण्यात आले. त्यांना ही माहिती देण्यासाठी हे कॉल केले गेले होते.