आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सिनेमा आणि वेब सिरीजच्या शूटिंगवर परिणाम होत आहे. यावर्षी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये सुमारे 40 वेगवेगळ्या चित्रपट आणि वेब सिरीजचे शूटिंग होणार होते पण काेरोनामुळे काही मोजक्याच चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. आता महाराष्ट्रातही हिंदी आणि मराठीचे मिळून 90 मालिका, 20 चित्रपट आणि वेब शोजच्या शूटिंगवर संकट आले आहे. मालिकेच्या सेटवर उपस्थित प्राॅडक्शन टीमच्या लोकांनी सांगितले की, बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी नोटीस दिली आहे, दोन दिवसात परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर 15 दिवसासाठी शूटिंगवर बंदी आणली जाईल.
पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अलर्टचा परिणाम चित्रपटाच्या सेटवरदेखील पडत आहे. आलियाच्या ‘गंगुबाई’ चित्रपटाचे काम फक्त एक दिवसाचे उरले आहे, मात्र याचे शूटिंगही बंद आहे. या चित्रपटाच्या सेटवरुन आतापर्यंत 25 कोविड पॉझिटिव्ह झाल्याची बातमी आहे. दुसरीकडे ‘राम सेतू’च्या सेटवर 45 लोकांच्या कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या बातमीला निर्मात्यांनी फेक असल्याचे सांगितले हाेते, मात्र या चित्रपटाचे शूटिंगही थांबले आहे. त्यामुळे निर्माते तणावात आले आहेत.
अमिताभ आणि रश्मिका यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘गुडबाय’च्या सेटवरून एक ताजी बातमी आली. येथेही 25 लाेकांची पाॅझिटिव्ह होण्याची बातमी आली. सेटवरील क्रू मेंबर्सनुसार सेटवर सध्या युद्धासारखी परिस्थिती झाली आहे. लष्कर कसे संकटाच्या परिस्थिती कमी मनुष्यबळात कामकरते तशीच टीम करत आहे. आम्ही 100 च्या ऐवजी फक्त 30 कलाकारांच्या उपस्थितीत शूटिंग करत आहोत.
‘बीएमसी टीव्ही मालिकेच्या सेटवर जाऊन काय म्हणाली आम्हाला माहिती नाही, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आम्ही सर्वच निर्माते कोविड प्रोटोकॉलचे पालन करत शूटिंग करत आहाेत. वीकेंडवर आम्ही शूटिंग करत नाही. गेल्या वर्षासारखी परिस्थिती शहरात आली तर आम्ही सीएम आणि बीएमसीच्या गाइडलाइननुसारच काम करू.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.