आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Due To Covid, The Team Is Also Facing Troubles In Glasgow, The DOP Of Bell Bottom Was Looking For The Location By Hiring A Goods Vehicle

बेलबॉटम:कोरोनामुळे ग्लासगोच्या निर्जन भागात केले गेले ‘बेलबॉटम’चे शूटिंग; लॉकडाऊनदरम्यान सामान नेणारी गाडी भाड्याने घेऊन गुप्तपणे शोधली चित्रीकरणासाठी ठिकाणे

अमित कर्ण2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हॉटेलच्या जवळच उभारण्यात आले बरेच सेट

कोराेना आणि लॉकडाऊनमुळे अनेक निर्माते परदेशात जाऊन तेथील लाइव्ह लोकेशनवर शूटिंग करण्याऐवजी देशातच सेट बनवून शूटिंग करत आहेत. तथापि, यापूर्वी कोरोनाची पहिली लाट आली होती तेव्हा अक्षय कुमार, जॅकी भगनानी आणि रंजीत तिवारी ‘बेलबॉटम’ चित्रपटासाठी लोकेशन शोधण्यासाठी स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरात गेले होते. तेथे त्यांनी अनेक ऐतिहासिक ठिकाणांचा शोध घेतला. तेथे नंतर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रॉ, अतिरेकीचे ठिकाण आणि चंदिगडचे मार्केटचे भव्य सेट उभारण्यात आले. विशेष म्हणजे यात वापरण्यात येणारे सामान मुंबईवरून चार्टर्ड प्लेनमधून नेण्यात आले. याशिवाय या विमानात सुमारे 150 लोकही उपस्थित होते. त्यात अक्षय कुमारसह अनेक कलाकार आपल्या कुटुंबासोबत प्रवास करत हाेते.

  • हॉटेलच्या जवळच उभारण्यात आले बरेच सेट

ग्लासगोला गेल्यावर तेथील निर्जन लोकेशन शेाधले गेले. नशिबाने त्यांना हाॅटेलच्या जवळच मिळाले. तेथे लोकांचे येणे-जाणे कमी होते. तेथे बरेच सेट उभारण्यात आले. त्यात ‘रॉ ऑफिस’, फ्रेन्च क्लास, मंत्र्याच्या खोल्या, विमान नियंत्रित करणारे टाॅवर, ग्लास रूम, अतिरेक्यांचे ठिकाण इत्यादी मुख्य आहेत. विशेष म्हणजे अशा प्रकारचे ठिकाण शोधण्यासाठी चित्रपटाचे डीओपी राजीव रवी, दिग्दर्शक रंजीत तिवारी आणि प्राॅडक्शन डिझायनर लपून ग्लासगोला फिरायला जात होते. कारण तेथे त्यावेळी लॉक डाऊन पूर्णपणे उघडले नव्हते. तिघांनी सामान नेणारी गाडी भाड्याने घेऊन लोकेशन शोधत होते. राजीव रवी यापूर्वी ‘बॉम्बे वेल्वेट’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’ आणि ‘उड़ता पंजाब’ सारख्या चित्रपटाचे डीओपी राहिले आहेत.

  • फ्रेंच बाेलताना दिसणार अक्षय

या चित्रपटात अक्षय देशाची सेवा करण्यासाठी आपल्या बहिणीच्या सांगण्यावरुन रॉ एजन्सी जाॅइन करतो. यात अक्षय फ्रेंच बोलताना आणि शिकताना दिसणार अाहे. या चित्रपटात अक्षयच्या व्यतिरिक्त वाणी कपूर, हुमा कुरैशी आणि लारा दत्ता मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपट १९ ऑगस्टला ३ डीमध्ये रिलीज होणार आहे. याचे ट्रेलर मंगळवारी चित्रपटाच्या पूर्ण टीमच्या उपस्थितीत दिल्लीच्या एका थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला.

  • 'रक्षाबंधन’चे मुंबई शेड्यूल पूर्ण झाले

यादरम्यान मंगळवारी अक्षयने आनंद एल.रायचा चित्रपट 'रक्षाबंधन’चे शूटिंग पूर्ण केले. अक्षयने सोशल मीडियावर सेटवरील काही फोटो शेअर करत लिहिले... 'मला चांदनी चौकच्या गल्लीत फिरणे आठवत आहे. सुमित, तू चित्रपटाच्या सेटला जीवंत केले होतेस. माझी उत्साही सहकारी भूमी पेडणेकरला प्रतिभेनुसार काम दिल्याने तुझे आभार मानतो. आनंद एल राय सरांविषयी तर माझ्याकडे शब्द नाहीत. ते तर अप्रतिम आहेत. रक्षाबंधन’चे मुंबई शेड्यूल पूर्ण झाले आहे.’

बातम्या आणखी आहेत...