आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेलबॉटम:चित्रपटगृहे सुरु न झाल्याने चित्रपटाला बसला 20 कोटींचा फटका, अमेझॉन प्राइमसोबत निर्मात्यांनी साइन केला 45 कोटींचा करार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'मास्टर'प्रमाणेच चित्रपटगृहात रिलीज झाल्याच्या दोन आठवड्यांनंतर ओटीटीवर येणार ‘बेलबॉटम’

हिंदी सिनेमाचा गड म्हणवल्या जाणा-या महाराष्ट्रात चित्रपटगृहे उघडले नसल्याने देशभरातील चित्रपटगृहांना बरेच नुकसान झेलावे लागत आहे. निर्मात्यांनीदेखील चित्रपटगृहातून पूर्णपणे रिकव्हरी मिळत नाही. कारण एकट्या महाराष्ट्रातूनच प्रत्येक चित्रपटाला सुमारे 30 टक्केपर्यंत महसूल मिळतो. या कारणामुळे अनेक चित्रपट थेट ओटीटीवर रिलीज होत आहेत. किंवा दक्षिणेतील हिट चित्रपट मास्टरचा फॉर्मुला वापरत आहेत. 19 ऑगस्टला रिलीज होणा-या अक्षय कुमारच्या बेलबॉटमने तोच फॉर्मुला स्वीकारला आहे. ज्याप्रमाणे मास्टर रिलीज झाला होता, त्याचप्रमाणे बेलबॉटम देखील चित्रपटगृहांत रिलीज झाल्याच्या दोन आठवड्यानंतर ओटीटीवर दाखवला जाणार असल्याचे तज्ज्ञ विश्लेषक आणि प्राइम व्हिडिओचे अधिका-यांनी सांगितले.

  • 45 कोटींमध्ये झाला प्राइमसोबत करार

प्राइम व्हिडिओच्या अधिका-यांनी सांगितले, 'बेलबॉटम'चा करार आधी डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी केला जात होता. यासाठी निर्मात्यांनी प्राइम व्हिडिओकडून 90 कोटी रुपये मागितले होते. एवढी मोठी रक्कम प्राइम व्हिडिओसाठी फायद्याचा सौदा नव्हता. कारण यापूर्वी कुली नंबर 1, लक्ष्मी आणि गुलाबो सिताबो सारख्या चित्रपटात त्यांना मोठा नफा मिळाला नव्हता. बेलबॉटमसाठी प्राइम निर्मात्यांना 65 कोटी द्यायया तयार झाले होते. तेदेखील थेट ओटीटीवर रिलीज केल्यानंतर. मात्र निर्मात्यांनी हा चित्रपट आधी चित्रपटगृहांत रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता प्राइम व्हिडिओने रक्कम 65 कोटीपेक्षा कमी केली. आता चित्रपटगृहांत प्रदर्शित झाल्याच्या दोन आठवड्यानंतर ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी निर्मात्याला 45 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

  • थेट डिजिटलवर प्रदर्शित केल्यास निर्मात्यांना मिळते मोठी रक्कम

थेट डिजिटलवर चित्रपट प्रदर्शित केल्याने निर्मात्यांना मोठा फायदा होत आहे. त्यांना दुप्पट रक्कम मिळत आहे. उदाहरण म्हणून सिद्धार्थ मल्होत्राच्या शेरशाहच्या निर्मात्यांना 70 कोटी रुपये देण्यात आले आहेत. आता याच धरतीवर इम्रान हाश्मीचा इजरादेखील डायरेक्ट टू डिजिटलवर येणार आहे. चित्रपट सप्टेंबरमध्ये रिलीज होणार आहे.

  • ओटीटी आणि सॅटेलाइट अधिकारातूनच होणार वसुली

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श सांगतात, 'बेलबॉटम सारख्या चित्रपटांचा निर्मिती खर्च 100 कोटींपेक्षा जास्त असतो. अशा प्रकारच्या चित्रपटाची वसुली महाराष्ट्र आणि इतर राज्यातील चित्रपटगृहे उघडेल तेव्हाच होऊ शकेल. सध्याची परिस्थिती तशी दिसत नाही. मात्र 19 ऑगस्टला थिएटर उघडण्याचा आदेश आला तर तेव्हा काही होऊ शकते. असं झालं नाही तर चित्रपट ओटीटी व्यतिरिक्त परदेशी बाजारातून आपली किंमत वसूल करु शकते. मोठ्या बजेटच्या चित्रपटाद्वारे सिनेमागृहे पुन्हा सुरु होत आहेत, ही चांगली गोष्ट आहे.'

  • 'सुर्यवंशी'देखील होऊ शकतो रिलीज

दुसरीकडे निर्मात्यांसोबत आम्ही चित्रपटगृहे उघडण्याची वाट पाहात आहोत, असे नेटफ्लिक्सच्या अधिका-यांचे म्हणणे आहे. आता ते सुर्यवंशीच्या रिलीजची जास्त वाट पाहू शकत नाही. निर्मात्यांना त्यांच्याकडून एक डेडलाइन दिली जाणार आहे. त्या तारखेपर्यंत थिएटरमध्ये रिलीज करण्याची वाट पाहिली जाईल. त्यानंतर चित्रपट थेट डिजिटल माध्यमांवर रिलीज करावा लागेल. या करारावर रिलायन्सचे अधिकारी तयार आहेत. रोहित शेट्टीसोबत चर्चा सुरु आहे. मात्र चित्रपटाचे डिजिटल राइट्स नेटफ्लिक्सकडे आहेत.

बातम्या आणखी आहेत...