आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा परिणाम:धुळ खात पडला आहे 9 एकर परिसरातील अजय देवगणच्या 'मैदान'चा सेट, लॉकडाऊनमुळे होऊ शकत नाहीये शूटिंग 

अमित कर्ण. मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्टेडियमच्या या सेटवर ऑलिम्पिक सीक्वेन्सचे चित्रीकरण केले जाणार होते.

लॉकडाऊनमुळे फिल्म इंडस्ट्रीच्या कामावर वाईट परिणाम झाला आहे. नवीन चित्रपटांचे शूटिंग सुरू होऊ शकत नाहीये. ज्या चित्रपटांचे पुढील शेड्युल सुरू होणार होते त्यांनादेखील ग्रहण लागले आहे. उदाहरणार्थ, अजय देवगण मार्च-एप्रिलमध्ये आपल्या आगामी 'मैदान' या चित्रपटाचे महत्त्वाचे शेड्युल सुरू करणार होता. परंतु गेल्या एका महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे ते सुरू होऊ शकले नाही आणि त्यासाठी तयार केलेला सेट धूळ खात पडला आहे.

  • 9 एकर परिसरात आहे सेट

गेल्या 8 महिन्यांपासून 9 एकर परिसरात एका भव्य स्टेडियमचा सेट बनवला जात होता. स्टेडियमच्या या सेटवर ऑलिम्पिक सीक्वेन्सचे चित्रीकरण केले जाणार होते. या सेटवर तब्बल 7 कोटी रुपये खर्च झाल्याचे बोलले जात आहे. चित्रपटाविषयी याचे दिग्दर्शक अमित शर्मा यांनी काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत.

  • अमित म्हणाले - कलाकार सेटवर पोहोचले होते

दैनिक भास्करला दिलेल्या खास मुलाखतीत शर्मा म्हणाले, "चित्रपटाच्या सेटवर किती खर्च झाला हे मी सांगू शकत नाही. कारण मी निर्माता नाही. पण हो मी निश्चितपणे म्हणू शकतो की सेट उभा आहे. मैदान तयार आहे. या सेटवर एक प्रचंड गुंतवणूक केली गेली होती. पण आत्ता काहीच करता येत नाही. तेथे कोणीही जाऊ शकत नाही. हे मैदान मागील सहा-सात महिन्यांपासून बनवले जात होते. आम्ही खरेखुरे स्टेडियम बनवणा-या क्यूरेटर्स आणले होते. एखादा सामान्य माळी हे बनवू शकला नसता. आम्ही डी.वाय. पाटील आणि वानखेडे स्टेडियमच्या क्युरेटर्सला बोलावून ग्राऊंडची निर्मिती केली. आम्ही ऑलिम्पिक आकाराचे स्टेडियम आणि रनिंग ट्रॅक तयार केला आहे. हे सर्व 9 एकर परिसरात बनवण्यात आले आहे"

  • '30 -35 दिवसाचे शूटिंग ठरले होते '

अमित पुढे म्हणाले, "जर हा लॉकडाऊन आणि कोरोनाचा प्रादुर्भाव नसता तर सुमारे 30 ते 35 दिवसांचे शूटिंग ठरले होते. फुटबॉलमध्ये जेवढे सिक्वेन्सेस असतात, त्या सर्वांचे शूटिंग येथे होणार होती. जे कलाकार बाहेरच्या टीमचे प्रतिनिधित्व करणार होते, तेदेखील येथे पोहोचले होते. पण त्या सर्वांना परत पाठवावे लागले. ते खेळाडू ऑस्ट्रेलिया, फिनलँड, फ्रान्स, युगोस्लाव्हिया आणि काही युरोपियन देशांचे होते. त्या खेळाडुंना बोलवणे आवश्यक होते. कारण चित्रपटात ऑलिम्पिकचा एक महत्त्वाचा सिक्वेन्स होता आणि त्यासाठी आम्हाला प्रोफेशनल खेळाडूंना दाखवणे महत्त्वाचे होते."

  • व्हीएफएक्सच्या मदतीने तयार केली जाते लोकांची गर्दी

अमित म्हणाले, "आम्हीही स्टेडियमचे स्टँड्सही बनवले होते. त्यातून आम्ही लोकांची गर्दी दाखवणार होतो. प्रत्यक्षात आम्ही 400 लोकांच्या जमावासोबत शूट करणार होतो आणि मग त्याला व्हीएफएक्सच्या मदतीने हजारोंच्या गर्दीत रुपांतरित करणार होतो. आमचे संपूर्ण युनिट बाहेरून आले होते. खास नृत्यदिग्दर्शक आले होते, जे रनिंग ट्रॅकवर धावणा-या खेळाडुंना शूट करणार होते. त्यासाठी एक वेगळे तंत्र वापरण्यात येते. ऑस्ट्रेलियन कॅमेरापर्सन क्रिस रीड यांना यासाठी नेमण्यात आले आहे, जे स्पोर्ट्सचे मव्स कॅप्चर करतील."

  • 11 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे चित्रपट

या चित्रपटात अभिनेता अजय देवगन फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहमानच्या भूमिकेत दिसणार आहेत, ज्यांच्या नेतृत्वात भारतीय फुटबॉल संघाने 1951 आणि 1952 मध्ये आशियाई खेळ जिंकले होते. 2018 मध्ये या चित्रपटाची घोषणा केली गेली. अमित रविंद्रनाथ शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट 11 डिसेंबर 2020 रोजी प्रदर्शित होईल.

बातम्या आणखी आहेत...