आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भूमी पेडणेकर लवकरच दुर्गामती या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटचा लक्ष वेधून घेणारा ट्रेलर अॅमेझॉन प्राइमने रिलीज केला आहे. या थ्रिलरपटात भूमीसह माही गिल, जीशु सेनगुप्ता आणि करण कपाडिया, अर्शद वारसी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
भूमीनेदेखील चित्रपटाचा ट्रेलर इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्यासोबत तिने लिहिले, 'दुर्गामती ट्रेलर. मी तुमच्यासोबत हा ट्रेलर शेअर करण्यासाठी बरीच वाट बघितली आहे. हे आमचे कठोर परिश्रम आहे. माझे आतापर्यंतचे सर्वात खास आणि आव्हानात्मक काम.'
पुढे भूमीने तिचे को-स्टार अक्षय आणि दिग्दर्शकाचे आभार मानले आणि लिहिले, 'अक्षय, अशोक, विक्रम आणि भूषण कुमार यांनी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या सर्वांसाठी फक्त प्रेम आणि कृतज्ञता'.
चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अशोक यांनी केले असून विक्रम मल्होत्रा निर्माते आहेत. भूषण कुमार यांच्या टी -सीरीज आणि अक्षय कुमारच्या केप ऑफ गुड फिल्म्स बॅनरअंतर्गत प्रस्तुत करण्यात आले आहे. 'दुर्गामती' चित्रपटाचा प्रीमियर या डिसेंबरमध्ये अॅमेझॉन प्राइमवर होणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक अशोक ब्लॉकबस्टर तेलुगू फिल्म 'भागमती' (2018) साठी ओळखले जातात. 'दुर्गामती' हा चित्रपट 'भागमती'चा हिंदी रिमेक आहे. चंचल चौहान असे भूमीच्या भूमिकेचे नाव असून तिच्याभोवतीच चित्रपटाची कथा फिरते. सत्ता आणि पैसा अशा दोन्ही गोष्टी हातात असलेल्या देशातील मोठ्या व्यक्तींच्या कटात ती आरोपी ठरते आणि त्यानंतर एका पडक्या वाड्यात तिची चौकशी केली जाते. त्या चौकशीदरम्यान त्या वाड्यात कोणकोणत्या गोष्टी घडतात आणि चंचलची दुर्गामती कशी होते याची रंजक कथा चित्रपटात पाहायला मिळेल. भारतासह 200 देशातील प्राइम सदस्य 11 डिसेंबर रोजी अॅमेझॉन प्राइमवर 'दुर्गामती' हा चित्रपट बघू शकणार आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.