कोरोनाव्हायरस / लॉकडाऊनदरम्यान लेखक जोपासत आहेत सर्जनशीलता, लिखाण करून घालवत आहेत आपला वेळ

डावीकडे -लेखक अंजुम राजाबली, उजवीकडे - गीतकार मनोज मुंतशीर डावीकडे -लेखक अंजुम राजाबली, उजवीकडे - गीतकार मनोज मुंतशीर

  • ही वेळ त्यांच्यासाठी किती फायदेशीर आहे याबाबत दैनिक भास्करने इंडस्ट्रीच्या काही उत्कृष्ट लेखकांसोबत चर्चा केली

दिव्य मराठी

Apr 04,2020 12:03:12 PM IST

बॉलिवूड डेस्क. बॉलिवूड डेस्क चित्रपटसृष्टीशी संबंधित असे बरेच लेखक आहेत, ज्यांना एकांतात स्क्रिप्ट लिहायला आवडते. सध्या देशात लॉकडाऊन सुरू असल्यामुळे लेखक आपल्या कामात गुंतले आहेत. ते सर्जनशील लिखाण करून आपला वेळ घालवत आहेत. .

  • लॉकडाऊनमुळे माझी कार्यक्षमता 25 टक्के वाढली आहे’
 अंजुम राजाबली, (गुलाम, द लेजेंड ऑफ भगत सिंह, राजनीतीसारख्या हिंदी चित्रपटाचे लेखक)
अंजुम राजाबली, (गुलाम, द लेजेंड ऑफ भगत सिंह, राजनीतीसारख्या हिंदी चित्रपटाचे लेखक)

► सध्याचे वातावरण काम करण्यासाठी चांगले आहे. एकांतात बसणे अनिवार्य आहे. मात्र हे दुधारी तलवारीसारखे आहे. एका बाजूने आमच्यासारख्या लेखकांना खूप वेळ मिळतो आहे आणि दुसरीकडे बाहेरची परिस्थिती पाहिली तर मजूर, गरीब, बेघर लोकांबाबत पाहतो, ऐकतो तर मन सुन्न होते. हे सर्व पाहून मन उदास होते. लेखक प्रथम एक नागरिक आहे असे मला वाटते. बाहेरची ही वाईट परिस्थिती पाहून मनही उदासच राहते आिण सर्जनशीलतेने काम करू शकत नाही. अशा परिस्थितीत मनाला सावरून एका आव्हानाप्रमाणे कामाला बसावे लागते. आता तर घरातील कामातच दीड-दोन तास निघून जातात, हा एक वेगळा अनुभव आहे. असे असले तरी माझी कार्यक्षमता 25 टक्के वाढली आहे. मी खूप वाचतोय, लिहितोय आणि विचारदेखील करतोय, तर दुसऱ्या बाजूने वाईट बातम्या ऐकून मन उदास होत आहे आिण लिहिण्याची इच्छाही होत नाही. उदासवाणं वाटतंय. चार -पाच दिवसांपूर्वीच एक लिखाण पूर्ण झाले आहे. सध्यातरी काहीच सांगू शकत नाही. चित्रपटांच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. वेबसिरीजवर आता काहीच काम सुरू नाही. विसलिंग वूडमध्ये आता ऑनलाइन शिकवतो. दिवसातून फक्त 40-40 मिनिटांचे दोनच सेशन घेतो.

  • लॉकडाऊनमध्ये माझे काम थांबलेही नाही आणि वाढलेही नाहीमनोज मुंतशीर, गीतकार (एक विलन, रुस्तम, केसरीसारख्या चित्रपटांत लिहिली गीते)
  • मनोज मुंतशीर, गीतकार (एक विलन, रुस्तम, केसरीसारख्या चित्रपटांत लिहिली गीते)

    ► मी सध्या बऱ्याच म्युझिक सेटिंग्ज व्हिडिओ कॉलवरून करतो आहे. आम्ही असे लोक आहोत, जे लिहिण्यासाठी 9 ते 10 तास खोल्यांमध्ये राहतो. माझ्यासाठी खरंतर काही बदलले नाही. पूर्वी मी जेवढे काम करायचो तेवढेच आताही करतो आहे. एकांत हा आमच्यासाठी आशीर्वाद आहे. सध्या मी नवीन संवाद लिहितोय. संगीत दिग्दर्शक आणि चित्रपट दिग्दर्शकांसोबत व्हिडिओ चॅटिंग करून माझे काम पूर्ण करतोय. माझे काम अजिबात थांबले नाही. खरंतर या दिवसांमध्ये काम वाढले आहे. शाहिद कपूरचा चित्रपट ‘जर्सी’चे गाणे आणि अजय देवगण अभिनीत ‘चाणक्य’वर काम मी नीरज पांडेसोबत काम करतोय. आमिर खानच्या आगामी चित्रपट ‘वेदा’चेदेखील काम सुरू आहे. मागील 7 दिवसांत मी 5-6 वेळा फेसबुक लाइव्ह केले. यामध्ये चाहत्यांसोबत गप्पा मारल्या. लॉकडा‌ऊनदरम्यान मी खूप वाचन केले जे व्यक्तिगतरीत्या माझ्यासाठी समृद्ध आहे. आता वाचायला वेळ मिळाला तर मी ‘वैशाली की नगरवधू’ हे पुस्तक पूर्ण वाचले. आताच शिवाजी यांचे ‘मृत्युंजय’ संपवले. अलीकडेच मी कोरोनावर एक गाणे लिहिले आहे- ‘मालिक संभाल लेना.’

X
डावीकडे -लेखक अंजुम राजाबली, उजवीकडे - गीतकार मनोज मुंतशीरडावीकडे -लेखक अंजुम राजाबली, उजवीकडे - गीतकार मनोज मुंतशीर