आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Dwayne Johnson, His Wife And Two Daughters Were Tested Positive For Covid 19, Actor Calls It ‘most Challenging, Difficult Thing’ They Ever Faced

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाच्या विळख्यात 'द रॉक' फॅमिली:'जुमांजी' फेम ड्वेन जॉनसनसह त्याच्या पत्नी आणि दोन मुलींना झाली होती कोरोनाची लागण, म्हणाला - आमच्यासाठी हा सर्वात आव्हानात्मक काळ होता

3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
48 वर्षीय ड्वेन जॉनसनच्या मते, एका जवळच्या मित्रामुळे त्याला, त्याची 35 वर्षीय पत्नी लॉरेन आणि दोन मुली जास्मीन (4) आणि टिआना (2) यांना जवळजवळ अडीच आठवड्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.
 • ड्वेन जॉनसनने एक व्हिडिओ शेअर करुन त्याच्या कुटूंबाला कोविड - 19 ची लागण झाल्याचे सांगितले आहे.
 • अभिनेता म्हणाला- ही सर्वात आव्हानात्मक वेळ आहे, ज्याच्या सामना कुटुंबाने विशेषत: मी केला.

'द ममी रिटर्न्स', 'बेवॉच' आणि 'जुमांजी' सारख्या हॉलिवूड चित्रपटात झळकलेला प्रसिद्ध अभिनेता ड्वेन 'द रॉक' जॉनसन आपल्या कुटुंबासह कोरोनामुक्त झाला आहे. ड्वेनने सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली. गुरुवारी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करुन त्याने सांगितले की, सुमारे अडीच आठवड्यांपूर्वी त्याच्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलींना कोरोना विषाणूची लागण झाली होती आणि त्यांची प्रकृती खालावली होती. मात्र आता सर्वजण पूर्णपणे बरे झाले आहेत.

 • मित्राच्या संपर्कात आल्याने 'द रॉक' संक्रमित झाला होता

'द रॉक' म्हणून प्रसिद्ध असलेल्या 48 वर्षीय जॉनसनने सांगितल्यानुसार, तो, त्याची 35 वर्षीय पत्नी लॉरेन आणि दोन मुली जास्मीन (4) आणि टिआना (2) यांना जवळजवळ अडीच आठवड्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. एका जवळच्या मित्राच्या संपर्कात आल्याने त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. परंतु, आपल्या मित्राला कोरोना संक्रमण कसा झाला याबद्दल त्यांना माहिती नाही.

 • कोविड -19 बरोबर संघर्ष करणे आव्हानात्मक होते

व्हिडिओमध्ये 'द रॉक' म्हणतोय, "हा सर्वात कठीण आणि आव्हानात्मक काळ होता. ज्याचा सामना माझ्या संपूर्ण कुटुंबाने विशेषतः मी केला आहे.'' त्याने सांगितले की, काही दिवसांपूर्वी त्याच्या मुलींच्या घशात खवखव झाली होती, मात्र त्या लवकरच ब-या झाल्या. पण त्याची आणि पत्नी लॉरेनची प्रकृती खालावली. तो पुढे म्हणतो, "संपूर्ण कुटुंब आता ठीक आहे, हे सांगताना मला खूप आनंद होतोय. आता आम्ही कोरोनामुक्त आहोत. आम्ही बरे आहोत याबद्दल देवाचे आभार मानतो."

 • आवाहन - संसर्ग रोखण्यासाठी मास्क घाला

व्हिडिओमध्ये ड्वेन जॉनसनने लोकांना मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. तो म्हणतो, "काही राजकारण्यांसह काही लोक मास्क घालण्याची कल्पना आणतील आणि त्यास राजकीय अजेंडा बनवतील हे पाहून मला आश्चर्य वाटले. खरं म्हणजे ती योग्य गोष्ट आहे आणि मास्क घालणे ही एक जबाबदारी आहे."

 • ड्वेन जॉन्सनचा जनतेला संदेश

रॉकने व्हिडिओला कॅप्शन देताना लिहिले, "माझा संदेश सर्व लोकांसाठी - शिस्तबद्ध रहा. आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवा. निरोगी राहण्यास वचनबद्ध. मास्क घाला. आपल्या घरात रहा. सकारात्मक रहा आणि आपल्याबरोबर लोकांची काळजी घ्या."

 • अभिनेत्यासोबतच रेसलर होता 'द रॉक'

ड्वेन जॉनसनचे रिंगचे नाव द रॉक आहे. वास्तविक, तो अभिनय करण्यापूर्वी प्रोफेशनल रेसलर होता. त्याने वर्ल्ड रेसलिंग फेडरेशन (डब्ल्यूडब्ल्यूएफ, आता डब्ल्यूडब्ल्यूई) मध्ये रेसलिंग केली आहे. अभिनय आणि चित्रपटाच्या निर्मितीसह तो रेसलिंग करायचा. ऑगस्ट 2019 मध्ये त्याने रेसलिंग करिअरमधून निवृत्ती घेतली.