आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Eam Kangana Ranaut Accuses Mumbai Police For Display Blatantly Shameless Nepotism Even In Issuing Summons To CEO Of Dharma Productions Instead Of Karan Johar

नाराजी:पोलिसांनी करण जोहरऐवजी धर्मा प्रॉडक्शनच्या सीईओला चौकशीसाठी बोलावले, कंगनाने पोलिसांवर संताप व्यक्त करताना म्हटले- 'सुशांत हत्याकांड तपासाची चेष्टा करणे बंद करा'

3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • कंगनाने यापूर्वीच ट्विट करुन पोलिस करण जोहरला चौकशीसाठी बोलावणार नाहीत, कारण तो आदित्य ठाकरेंचा मित्र आहे, असे म्हटले होते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी चित्रपट निर्माता करण जोहरचा मित्र आणि धर्मा प्रॉडक्शनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्व मेहता यांना चौकशीसाठी समन्स पाठविले आहे. मात्र करण जोहरऐवजी अपूर्व मेहताला चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याने कंगना भडकली आहे. सुशांतच्या हत्याकांडाची चेष्टा करणे बंद करा, असे तिने मुंबई पोलिसांना म्हटले आहे.

कंगनाच्या टीमने रविवारी दुपारी दोन ट्विट केले. त्यातील पहिल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, "करण जोहरच्या मॅनेजरला समन्स पाठवण्यात आला आहे. मात्र आदित्य ठाकरे यांचा बेस्ट फ्रेंड करण जोहरला नाही. मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह राजपूतच्या हत्याकांडाच्या तपासाची चेष्टा करणे बंद करावी."

 • पोलिस असा निर्लज्जपणा कसा दाखवू शकतात?

दुस-या ट्विटमध्ये कंगनाच्या टीमने लिहिले की, "समन्स जारी करतानाही मुंबई पोलीस इतका निर्लज्जपणा कसा दाखवू शकतात? कंगनाला समन्स पाठवण्यात आला आहे तिच्या मॅनेजरला नाही. मात्र मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या सर्वात चांगल्या मित्राच्या मॅनेजरला चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. का? साहेबांना त्रास होऊ नये म्हणून?", असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

महेश भट्ट यांची चौकशी केली जाईल सुशांतने 14 जून रोजी मुंबईत त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. एएनआयच्या वृत्तानुसार राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आतापर्यंत 37 जणांचा जबाब पोलिसांनी नोंदवला असल्याचे सांगितले. आता कंगना रनोट, महेश भट्ट यांनाही आपला जबाब नोंदवण्यासाठी समन्स पाठवण्यात आला आहे. तर करण जोहरच्या मॅनेजरलाही कॉल करण्यात आला आहे. जर गरज पडली तर करण जोहरलाही बोलावण्यात येईल, असे देशमुख म्हणाले.

 • कंगनाने महाराष्ट्र सरकारवर केला होता हल्लाबोल

याप्रकरणी आतापर्यंत करण जोहरची चौकशी न झाल्याने शनिवारी कंगना रनोटच्या टीमने महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला होता. करण जोहर हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुलगा आणि मंत्री आदित्य ठाकरे यांचा मित्र आहे, त्यामुळे त्याला कधीही पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात येणार नाही असे ट्विट कंगनाच्या टीमने केले होते. एक टि्वटला उत्तर देताना कंगनाच्या टीमने हा दावा केला होता.

 • ट्विटर युजरचा हा होता प्रश्न

सुमित ठाकूर नावाच्या एका ट्विटर युजरने करण जोहरचा फोटो शेअर करीत लिहले होते की, 35 दिवस झाले, मात्र अजूनही यातील संशयित करण जोहरला सुशांतच्या केसमध्ये चौकशीसाठी बोलावले नाही, मी वकील रसपाल सिंह रेणू यांच्या माध्यमातून मुंबई पोलिसांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करीत आहे जेणेकरुन जनहिताची स्वतंत्र आणि निःपक्षपाती चौकशी होऊ शकेल."

 • टीम कंगना रनोटची प्रतिक्रिया

ट्विटवर प्रतिक्रिया व्यक्त करताना कंगनाच्या टीमने लिहिले की, "ते कधीही त्याला बोलावणार नाहीत. कारण तो आदित्य उद्धव ठाकरे यांचा चांगला मित्र आहे. हे त्यांचे सरकार आहे आणि त्यांनी कंगनाच्या मुलाखतीपूर्वी हे प्रकरण बंद केले. ते आपल्या मित्राचा बचाव करत असल्याचा हा पुरावा आहे."

 • कंगनाने अनेक मुलाखतींमध्ये प्रश्न उपस्थित केले आहेत

सुशांतच्या निधनानंतर कंगनाने अनेक मुलाखतींमध्ये पोलिस करण जोहरची चौकशी का करत नाहीये? हा प्रश्न उपस्थित केला आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत कंगनाने करण व्यतिरिक्त आदित्य चोप्रा, राजीव मसंद आणि महेश भट्ट यांची नावेही गटबाजी करणा-यात जोडली होती आणि मुंबई पोलिसांनी त्यांची चौकशी करावी असे सांगितले होते. इतकेच नाही तर कंगनाने असेही म्हटले आहे की, जर ती आपले दावे सिद्ध करण्यास अक्षम राहिली तर ती आपला पद्मश्री पुरस्कार सरकारकडे परत करण्यास तयार आहे.

 • आतापर्यंत 37 लोकांची चौकशी करण्यात आली आहे

सुशांत सिंह राजपूत 14 जून रोजी मृतावस्थेत आढळला होता. त्याने आत्महत्या केल्याचे पोस्टमॉर्टम व व्हिसेरा अहवालात स्पष्ट झाले आहे. तसेच, पोलिसांच्या तपासणीत तो डिप्रेशनमध्ये असल्याचेही समोर आले आहे. सुशांत डिप्रेशनमध्ये का होता? आणि त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांनी 37 जणांची चौकशी केली. यात ब-याच मोठ्या नावांचा समावेश आहे. यामध्ये सुशांतवर उपचार करणा-या चारही डॉक्टरांव्यतिरिक्त, चित्रपट समीक्षक राजीव मसंद, यशराज फिल्म्सचे मालक आदित्य चोप्रा, दिग्दर्शक शेखर कपूर आणि संजय लीला भन्साळी, सुशांतचे घरातील कर्मचारी, मॅनेजर, पीआर टीम, एक्स मॅनेजर, मित्र, मैत्रिणी, सह-कलाकार आणि कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. यशराज फिल्म्सचे काही माजी अधिकारी आणि कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा, फिल्ममेकर रुमी जाफरी यांनीही आपला जबाब नोंदवला आहे. आणखी काही अधिका-यांची चौकशी केली जाईल.

दरम्यान, खासदार रुपा गांगुली, अभिनेता शेखर सुमन, टीव्ही अभिनेता तरुण खन्नासह अनेक जणांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. वकील, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकीय विश्लेषक ईशकरण सिंह भंडारी यांना या प्रकरणातील तथ्यांची चौकशी करत असून सीबीआयमार्फत या प्रकरणाची चौकशी करणे योग्य आहे की नाही हे तपासत आहेत.