आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दृश्यम-2'च्या कमाईचा ओघ सुरू:मंडे टेस्टमध्ये पास झाला चित्रपट, कामाचा दिवस असूनही 12 कोटींचा जमवला गल्ला

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'दृश्यम 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. मंडे टेस्टमध्ये हा चित्रपट पास झाला आहे. कामाचा दिवस असूनही सोमवारी या चित्रपटाने 11.87 कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे या चित्रपटाने अवघ्या चार दिवसांत 76 कोटींचा टप्पा पार केला आहे. हे वर्ष बॉलिवूड चित्रपटांसाठी अगदी सामान्य ठरले आहे, निवडक चित्रपटच प्रेक्षकांना थिएटरपर्यंत आणू शकले. आता 'दृश्यम 2' देखील बॉक्स ऑफिसच्या जबरदस्त कलेक्शनसह या यादीचा एक भाग बनला आहे. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व हिंदी चित्रपटांमध्ये दृश्यम 2 ने दुसरा सर्वोत्तम ओपनिंग वीकेंड गाठला आहे.

तरण आदर्श यांनी शेअर केले चित्रपटाचे कलेक्शन
ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाचे कलेक्शन शेअर करत लिहिले- "दृश्यम 2 दमदार कामगिरी करत आहे. चौथ्या दिवशीचा ट्रेंडही खूपच चांगला आहे. चित्रपटाने 75 कोटींचा टप्पा पार ओलांडला आहे आणि आता सगळ्यांचे लक्ष 100 कोटी क्लबवर आहे. शुक्रवार 15.38 कोटी, शनिवार 21.59 कोटी, रविवार 27.17 कोटी, सोमवार 11.87 कोटी. एकूण: 76.01 कोटी."

2022 मध्ये ओपनिंग वीकेंडला सर्वाधिक कमाई करणारे हिंदी चित्रपट

यावर्षी प्रदर्शित झालेल्या सर्व हिंदी चित्रपटांपैकी ब्रह्मास्त्रने ओपनिंग वीकेंडला सर्वाधिक कलेक्शन केले होते. ब्रह्मास्त्रने पहिल्या तीन दिवसांत 111 कोटींची कमाई केली होती. आता 64 कोटींच्या कलेक्शनसह 'दृश्यम 2' ने दुसरा क्रमांक पटकावला आहे. भूल भुलैया 2 जवळपास 56 कोटींच्या कलेक्शनसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर सम्राट पृथ्वीराज आणि गंगुबाई काठियावाडी हे चित्रपट आहेत.

'दृश्यम 2' हा 2022 मधील दुसरा सर्वात मोठा ओपनर ठरला
'दृश्यम 2' हा या वर्षातील दुसरा सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन 15.38 कोटी रुपये होते. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटांमध्ये ब्रह्मास्त्रने सर्वात मोठी ओपनिंग मिळवली होती. ब्रह्मास्त्रचे पहिल्या दिवशीचे कलेक्शन 37 कोटी होते. राम सेतू 15.25 कोटींसह दुसऱ्या क्रमांकावर होता, परंतु 15.38 कोटींच्या कलेक्शनसह दृश्यम 2 ने राम सेतूला मागे टाकले आहे.

चित्रपटाचे बजेट तीन दिवसांतच झाले वसूल
अभिषेक पाठक दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण, तब्बू, श्रेया सरन आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले होते, परंतु कोविड दरम्यान त्यांचे निधन झाले. त्यामुळे चित्रपटाचे निर्माते अभिषेक पाठक यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली. आता तीन दिवसांत 64 कोटींची कमाई करून या चित्रपटाने आपले बजेटही काढले आहे. चित्रपटाचे बजेट जवळपास 60 कोटी होते.

बातम्या आणखी आहेत...