आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत डेथ मिस्ट्रीमध्ये नवा ट्विस्ट:ईडीने रिया आणि सुशांत यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅटची माहिती नार्कोटिक्स विभागाला दिली, यात रिया ड्रग्जविषयी बोलत आहे

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 14 जून रोजी वांद्रे येथील फ्लॅटमध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह आढळला होता.
  • या प्रकरणात सुशांतच्या वडिलांनी रिया आणि तिच्या कुटुंबीयांविरुध्द गुन्हा दाखल केला होता.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. आता या प्रकरणात ड्रग्जचा अँगल समोर येत आहे. इंग्रजी वृत्तवाहिनी टाईम्स नाऊने दी दावा केला आहे की, मनी लाँडरिंग प्रकरणी चौकशी करणा-या ईडीने सुशांत आणि रिया चक्रवर्ती यांच्यातील व्हाट्सएप चॅटची माहिती सीबीआय आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोला दिली आहे.

रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, रिया ड्रग्जचा वापर आणि सोबतच त्यासंदर्भातील व्यवहारही करत होती. यापूर्वी राज्यसभेचे खासदार आणि भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दुबईतील ड्रग डिलरने सुशांत सिंह राजपूतची भेट घेतल्याचा आरोप केला आहे.

  • जप्त केलेला मोबाइल फोनच्या तपासणीतून उघड

10 ऑगस्ट रोजी अंमलबजावणी संचालनालयाने रिया आणि तिच्या कुटुंबीयांचे 4 मोबाइल हँडसेट जप्त केले होते. यातील दोन फोन रियाचे असून उर्वरित दोन तिच्या वडील आणि भावाचे आहेत. दोन आयपॅड आणि एक लॅपटॉपही ईडीने ताब्यात घेतला. या सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांना तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले होते. या तपासणी दरम्यान ड्रग्ज अँगल उघड झाल्याचा दावा केला जात आहे.

या प्रकरणात रिया आणि तिच्या भावाव्यतिरिक्त ईडी आतापर्यंत सुशांतचे वडील केके सिंह, बहीण प्रियंका, मितू, रिया चक्रवर्तीच्या कुटुंबातील सदस्य, चित्रपट निर्माते रुमी जाफरी, सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानी, सुशांतची माजी बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी, हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांच्यासह अनेकांची चौकशी केली आहे.

  • सुशांतचा कुक नीरजने ड्रग्जचा उल्लेख केला होता

सुशांतच्या कुक नीरज सिंहने ‘सुशांत गांजाचं सेवन करत होता’, असे सीबीआयच्या चौकशीदरम्यान सांगितल्याचे ‘इंडिया टुडे’च्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. 14 जून रोजी सुशांतने राहत्या घरी आत्महत्या केली. परंतु, आत्महत्या करण्यापूर्वी त्याने गांजाचे सेवन केले होते. इतकंच नाही तर सुशांतने मृत्युपूर्वी सलग तीन दिवस गांजा ओढला होता, असे नीरजने केलेल्या दाव्यात म्हटले आहे. सुशांत आठवड्यातून एक-दोन वेळा तरी घरी पार्टी करायचा. या पार्टीत रिया, आयुष असायचे आणि बऱ्याच वेळा या पार्टीत ते दारू, गांजा, सिगारेट ओढायचे. तसंच सॅम्युअल जेकब सुशांतसाठी गांजाचा रोल तयार करुन द्यायचे. कधी-कधी मीदेखील तयार करुन द्यायचो . इतकंच नाही तर सुशांतने आत्महत्या करण्यापूर्वी तीन दिवस आधी गांजाचे रोल केले होते. हे रोल तो कायम घरात असलेल्या जिन्याच्या खालच्या कपाटात ठेवत असते. त्यामुळे सुशांतचे निधन झाल्याचे लक्षात येताच प्रथम मी कपाटातील गांजाचा बॉक्स पाहिला. मात्र त्यातले सगळे रोल संपले होते, असे नीरज म्हणाला.