आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडचणीत अभिनेत्री:नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ, ED ने 200 कोटींच्या वसुली प्रकरणात चौकशीसाठी बजावले समन्स

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काय आहे प्रकरण?

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांना ED (अंमलबजावणी संचालनालय) ने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. नोरा ईडीच्या कार्यालयात दाखल झाली आहे. तर जॅकलिनची याप्रकरणी उद्या चौकशी होणार आहे. या दोघांची 200 कोटींच्या वसुली प्रकरणात चौकशी होणार आहे, ईडीने अभिनेत्री नोरा फतेही, जॅकलिन फर्नांडिस यांना साक्षीदार म्हणून बोलावले आहे.

काय आहे प्रकरण?
सुकेश चंद्रशेखर आणि त्याची कथित पत्नी अभिनेत्री लीना पाल तिहार कारागृहातून 200 कोटी रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणात तुरुंगात आहेत. सुकेशने दिल्लीच्या तिहार कारागृहातून नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा कट रचला होता.

200 कोटींच्या खंडणीचा मुख्य आरोपी सुकेश तिहार कारागृहातून अभिनेत्री जॅकलिनला फोन करायचा. सुकेश तिहार कारागृहातून कॉल स्पूफिंग सिस्टीमद्वारे अभिनेत्रीला फोन करायचा. पण त्याने आपली ओळख उघड केली नाही. एजन्सींना सुकेश चंद्रशेखरचे महत्त्वाचे कॉल डिटेल्स मिळाले आहेत. याद्वारे तपास यंत्रणांना जॅकलिनसोबत झालेल्या फसवणुकीची माहितीही मिळाली. सुकेश या प्रकरणातील मास्टर माइंड असून तो वयाच्या 17 व्या वर्षीपासून गुन्हेगारीत सामील आहे.

काही दिवसांपूर्वी झाली होती जॅकलिनची चौकशी
ईडीने काही दिवसांपूर्वीच मनी लाँडरिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसचा जबाब नोंदवला होता. जॅकलीन फर्नांडिसची दिल्लीत चार तास चौकशी केल्यानंतर, तिचे निवेदन मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) साक्षीदार म्हणून रेकॉर्ड करण्यात आले. आता तिची पुन्हा चौकशी केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...