आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत प्रकरणात ईडीची कारवाई:ईडीने आज सुशांतच्या बॉडीगार्डला चौकशीसाठी बोलावले, रिया चक्रवर्तीसह 6 जणांची झाली आहे आतापर्यंत चौकशी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, वडील इंद्रजित चक्रवर्ती यांची चौकशी केली आहे.
  • सुशांतची माजी बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी, मित्र सिद्धार्थ पिठानी आणि बहीण मीतू सिंह यांचीही चौकशी करण्यात आली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आर्थिक बाबींचा तपास करणा-या ईडीच्या टीमने गुरुवारी सुशांतच्या बॉडीगार्डला चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वी ईडीने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, वडील इंद्रजित चक्रवर्ती यांची चौकशी केली होती. सुशांतची माजी बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी, मित्र सिद्धार्थ पिठानी आणि बहीण मीतू सिंग यांचीही चौकशी करण्यात आली आहे.

ईडीने या प्रकरणात मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला आहे. तपासाठी ईडीने रिया चक्रवर्तीसह तिच्या वडील आणि भावाचा मोबाइल आणि लॅपटॉप ताब्यात घेतला आहे. तपास यंत्रणेचे म्हणणे आहे की, त्यांच्या फोनमधून पैशांच्या व्यवहारांबद्दल बरीच माहिती मिळू शकते. ईडीने रिया, शोविक आणि तिचे वडील इंद्रजित यांच्या एका वर्षाच्या कॉल डिटेलची चौकशी केली आहे. ईडी टीम 'फोन डंप अॅनालिसिस'च्या मदतीने डिलीट केलेला डेटा पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे.

  • श्रुती मोदीने सांगितले होते- सुशांतच्या आयुष्यात आल्यापासून रियाच त्याचे वैयक्तिक आणि व्यावसायिक निर्णय घेत होती.

सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदीने ईडीला सांगितले की, 'सुशांतच्या आयुष्यात आल्यापासून रियाच त्याचे वैयक्तिक आणि व्यावसायिक निर्णय घेत होती. मी कोणताही अवैध व्यवहार केलेला नाही, असे ती म्हणाली. सोबतच श्रुतीने ईडीला सुशांतच्या आयुष्याशी निगडीत रियाने घेतलेल्या काही प्रमुख निर्णयांची उदाहरणेही दिली आहेत. जेव्हा रिया सुशांतला भेटली, तेव्हा श्रुती त्याची बिझनेस मॅनेजर होती.

  • ईडीला संशय - बनावट शेल कंपन्यांत पैसे ट्रान्सफर झाले

बनावट शेल कंपनीच्या माध्यमातून सुशांतच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर झाल्याचा ईडीला संशय आहे. या शेल कंपन्या रिया आणि तिचा भाऊ शोविक यांच्याशी संबंधित असल्याचे सूत्रांकडून समजते. मुलाच्या खात्यातून 15 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप सुशांतचे वडील केके सिंह यांनी केला आहे. ईडीच्या चौकशीत सुशांतच्या खात्यात 15 कोटी नव्हे तर दहा कोटींहून अधिकची रक्कम असल्याचे समोर आल्याचे समजते.

बातम्या आणखी आहेत...