आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • ED's Inquiry In Sushant Case: Today, RIA Chakraborty's CA Was Summoned For The Second Time, To Be Questioned About Finance, Income And Expenses.

सुशांत प्रकरणात ईडीची कारवाई:आज रिया चक्रवर्तीच्या सीएला दुस-यांदा चौकशीसाठी बोलविण्यात आले;  फायनान्स, इनकम आणि खर्चांविषयी विचारणा होईल

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ईडीने रिया चक्रवर्तीचे सीए रितेश शहा यांच्याकडे काही कागदपत्रेही मागितली आहेत, जी आज ते सादर करू शकतात.
  • यापूर्वी 7 ऑगस्ट रोजी रितेश आणि रिया यांची समोरासमोर चौकशी झाली होती.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी रिया चक्रवर्तीचे सीए रितेश शाह यांना चौकशीसाठी बोलावले आले. यापूर्वी 7 ऑगस्टला रितेश आणि रिया यांची समोरासमोर बसून चौकशी केली होती. ईडी टीमने रितेश यांच्याकडे काही कागदपत्रेही मागितली आहेत, जी आज ते सादर करू शकतात. रितेश यांना रिया चक्रवर्तीचे फायनान्स, उत्पन्न आणि खर्च याबद्दल विचारणा केली जाईल.

  • ईडीने आतापर्यंत या लोकांची चौकशी केली आहे

ईडी या प्रकरणी मनी लाँडरिंगच्या अँगलने चौकशी करत आहे. आतापर्यंत ईडीच्या टीमने रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठानी, सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी, हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा यांच्यासह दहाहून अधिक जणांची चौकशी केली आहे. यात सुशांतच्या घरी काम करणार्‍या काही लोकांचाही समावेश आहे. याशिवाय सुशांतची बहीण मीतू सिंगचाही जबाब नोंदवण्यात आला आहे.

  • सीबीआयदेखील या प्रकरणाचा तपास करत आहे

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआयने 6 जणांविरूद्ध एफआयआर नोंदविला आहे. सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, इंद्रजित चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा आणि श्रुती मोदी यांच्याविरोधात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रिया चक्रवर्ती सुशांतची गर्लफ्रेंड होती. तिच्यावर सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त करणे, पैशांचा गैरफायदा, गुन्हेगारी कट करण्याचा आरोप आहे. सुशांतचे वडील केके सिंह यांनी रियाविरूद्ध एफआयआर दाखल केला होता. त्यांनी रियावर बरेच गंभीर आरोप केले आहेत.

  • घरी मृतावस्थेत आढळला होता सुशांत

सुशांत (34) चा मृतदेह 14 जून रोजी मुंबईतील त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. त्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून त्यांनी आतापर्यंत 56 लोकांचे जबाब नोंदवले आहेत. या प्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...