आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत प्रकरणात ईडीची चौकशी:ईडी कार्यालयात सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठानीची दुस-यांदा चौकशी, तिस-यांदा चौकशीसाठी पोहोचली श्रुती मोदी; आजच बहिणीचाही जबाब नोंदवला जाणार

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
सिद्धार्थची आज दुस-यांचा ईडीकडून चौकशी होतेय. ईडीच्या कार्यालयात जात असताना मीडियापासून स्वतःचा बचाव करताना सिद्धार्थ पिठानी - Divya Marathi
सिद्धार्थची आज दुस-यांचा ईडीकडून चौकशी होतेय. ईडीच्या कार्यालयात जात असताना मीडियापासून स्वतःचा बचाव करताना सिद्धार्थ पिठानी
  • श्रुती सुशांतच्या मृत्यूपूर्वी वर्षभर त्याची मॅनेजर होती.
  • सुशांतबरोबर रिया चक्रवर्तीचेही काम ती पाहात होती.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील आर्थिक बाबींची चौकशी करणारी अंमलबजावणी संचालनालयाची टीम मंगळवारी पुन्हा एकदा सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी आणि रूममेट सिद्धार्थ पिठानीची विचारपूस करत आहे. यापूर्वी 7 ऑगस्ट आणि 10 ऑगस्ट रोजी श्रुदी मोदीला चौकशीसाठी सामोरे जावे लागले होते. तर सिद्धार्थ पिठानी सोमवारी पहिल्यांदा ईडीच्या अधिका-यांसमोर हजर झाला होता. आज दुस-यांदा सिद्धार्थ चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात पोहोचला.

सोमवारी 10 तासांहून अधिक काळ झालेल्या चौकशीत श्रुतीने अनेक खुलासे केले आहेत. तिने आणि सुशांत तिच्यात झालेल्या कराराची कागदपत्रेही ईडी अधिका-यांना दिली आहेत. श्रुती मोदीसह सुशांतची बहीण मितु सिंह हिचाही जबाब ईडी आज नोंदवणार आहे. श्रुती मोदी सुशांतच्या मृत्यूच्या आधी एक वर्ष त्याची मॅनेजर म्हणून काम पाहात होती. सुशांतसह तिने रिया चक्रवर्तीचेही कामही पाहिले. याप्रकरणी मुंबई पोलिसांनीही दोनदा तिची विचारपूस केली होती.

सोमवारी श्रुती मोदी कागदपत्रांसह ईडी कार्यालयात पोहोचली होती. यादरम्यान, तिची सुमारे 10 तास चौकशी केली गेली.
सोमवारी श्रुती मोदी कागदपत्रांसह ईडी कार्यालयात पोहोचली होती. यादरम्यान, तिची सुमारे 10 तास चौकशी केली गेली.
  • रियाच्या फोन नंबरची चौकशी केली जाईल

सूत्रांच्या माहितीनुसार, मनी लाँडरिंगच्या प्रकरणातील पुराव्यासाठी आता ईडीची टीम अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या मोबाइल फोनची चौकशी करेल. ईडीचा असा संशय आहे की, तिच्या फोनमधील रेकॉर्डवरुन पैशांच्या व्यवहारासंदर्भात बरीच माहिती मिळू शकते. यापूर्वी ईडीने रियाची दोनदा आणि तिच्या भावाची तीनदा चौकशी केली आहे. ईडी टीमने रिया, शोविक आणि त्यांचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांचे एक वर्षाचे कॉल डिटेल रेकॉर्ड घेतले आहेत. ईडी टीम 'फोन डंप अॅनालिसिस'च्या मदतीने डिलीट केलेला डेटा पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे.

  • सुशांतचा घोट्याखालील पायाचा भाग वाकला होता : सुब्रमण्यम स्वामी

सुशांत आत्महत्या प्रकरणासंदर्भात सुरुवातीपासूनच शंका उपस्थित करणारे भाजपचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आता सुशांतच्या मृतदेहावर करण्यात आलेल्या शवविच्छेदनासंदर्भात शंका उपस्थित केली आहे. स्वामी यांनी सुशांतचे शवविच्छेदन झालेल्या कूपर रुग्णालयातील डॉक्टरांचीही सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणी ट्विटरवरुन केली आहे. त्यांनी मंगळवारी संध्याकाळी ट्विट केले की, “सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉ. सी. आर. कूपर महापालिका रुग्णालयातील पाच डॉक्टरांची सीबीआयने चौकशी केल्यास बरीच माहिती मिळेल. सुशांतचा मृतदेह रुग्णालयामध्ये नेणाऱ्या रुग्णवाहिकेमधील कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार पाय मुरगळलेल्या अवस्थेत होते,” असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...