आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Efforts To Bring The Shooting Of Films, Web Series And Serials Under The Ambit Of Industrial Works In MP From June, Half A Dozen Projects Will Resume From June 15

शूटिंग अपडेट:MP मध्ये 15 जूनपासून मध्य प्रदेशात सुरू होणार अर्ध्या डझन प्रोजेक्ट्सचे शूटिंग, ऐश्वर्या-बॉबी आणि सान्यासह अनेक कलाकर करतील आपापल्या चित्रपटाचे शूट

अमित कर्ण18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आता देशातील अनेक राज्यात अनलॉक झाले आहे. त्यामुळे सिने इंडस्ट्रीतील निर्मात्यांच्या जीवात जीव आला आहे. अनेक निर्मात्यांनी आता शूटिंगसाठी मध्य प्रदेशाची वाट धरली आहे. येथे जूनपासून काही चित्रपट, वेब सिरीज आणि मालिकांचे शूटिंग सुरू होणार आहे. येथे 15 जून पासून अर्ध्या डझन प्रोजेक्ट्सवर काम सुरू होणार आहे.

मध्यप्रदेश पर्यटनाचे अधिकारी हनी दीक्षित या बातमीला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, 'ग्लॅमर जगाशी संबंधित काम औद्योगिक काम मानले जाते. लेखी अजून आमच्याकडे आले नाही. तरीही राज्यातील 90 टक्के जिल्हे अनलॉक झाले आहेत. एक-दोन दिवसांत कुठे - कोठे शूटिंग करणे शक्य आहे, हे स्पष्ट होईल.'

शूटिंगची परवानगी मिळू शकते
वेगवेगळ्या प्राॅडक्शन हाऊसशी जाेडलेल्या लोकांनी सांगितले की, 15 जूनपासून मोठ्या बजेटच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. कारण मनोरंजनाशी जोडलेले काम औद्यागिक विषयात येते. या आधारावर आता निर्मात्यांनी शूटिंग सुरू करण्याची परवानगी मिळू शकते.

सिने कामगार संघटनेने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र
दुसरीकडे, मुंबईत शूटिंग पुन्हा सुरू करण्याची परवानगी मागण्यासाठी सिने कामगार संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. संघटनेचे प्रमुख बीएन तिवारी म्हणाले, गेल्या दीड वर्षापासून लाखो सिने आर्टिस्ट, वर्कर्स आणि तंत्रज्ञ घरी बेरोजगार बसलेले आहेत. रोजंदारी कामगार तर पूर्णपणे शूटिंगवर अवंलबून असतात. मुंबईत तर लॉकडाऊन पुन्हा 15 तारखेपर्यंत वाढवण्यात आले आहे. त्यामुळे आणखी परिस्थिती वाईट होईल, तरीदेखील आम्ही इंडस्ट्रीयल अॅक्टमध्ये येताे.

या प्रोजेक्ट्सवर होणार काम सुरू

  • बॉबी देओल, विक्रांत मेसी आणि सान्या मल्होत्राच्या ‘लव होस्टल’ यावर काम सुरू होणार आहे.
  • ऐश्वर्या रायचा अभिनय असलेल्या ‘पोन्नियन सेल्वन’चे शूटिंग मध्य प्रदेशात होणार आहे.
  • ऐश्वर्या आणि विक्रमसहित अनेक ज्युनियर आर्टिस्ट मांडव आणि महेश्वरमध्ये शूटिंग करतील.
बातम्या आणखी आहेत...