आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉक्स ऑफिस परफॉर्मन्स:‘एक विलन रिटर्नस' च्या तिसऱ्याच दिवशी 25% व्यवसाय वृद्धीची नोंद

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जॉन अब्राहम, अर्जुन कपूर, दिशा पटानी आणि तारा सुतारिया स्टारर ‘एक व्हिलन रिटर्न्स’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यामध्ये अवघ्या ३ दिवसांत २३ कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. दुसऱ्या दिवसाच्या तुलनेत तिसऱ्या दिवशी चित्रपटाच्या व्यवसायात २० ते २५% वाढ झाली आहे. यासोबतच ‘एक व्हिलन २’ हा २०२२ च्या ओपनिंग वीकेंडला सर्वाधिक कमाई करणारा ८ वा हिंदी चित्रपट बनला आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सांगितले की, ८० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी (रविवार) भारतातून ९.०२ कोटींचा व्यवसाय केला आहे. याआधी या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी (शनिवारी) ७.४७ कोटी रुपये आणि पहिल्या दिवशी (शुक्रवारी) ७.०५ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानुसार, चित्रपटाने पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजेच अवघ्या ३ दिवसांत भारतातून २३.५४ कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...