आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेलिव्हिझन क्वीनला कोरोना:एकता कपुरला कोरोनाची लागण, कालच केली होती मुलीची फेस मसाज; डेलनाझ ईरानीही कोरोनाच्या विळख्यात

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सिनेसृष्टीतील कलाकारांना कोरोना होण्याचे सत्र सुरुच आहे. नुकतेच आता एकता कपुरला देखील कोरोनाची लागण झाली आहे. एकताने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे, असे सांगितले आहे. सध्या एकताची प्रकृती सौम्य असून, संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी असे आवाहन देखील एकताने केले आहे.

एकता कपुरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ स्टोरी शेअर केली आहे. त्यामध्ये एकता आपली मुलगी गैंग याची फेस मसाज करताना दिसत आहे. हा व्हिडिओ निलम कोठारीने देखील शेअर केला आहे. एकताने शेअर केलेल्या अन्य एका फोटोत एकतासोबत निलम, पूजा सिप्पी आणि एकताची प्रोड्यूसर शबीना देखील फोटोत दिसत आहे.

डेलनाझ ईरानीला देखील कोरोनाची बाधा
टिव्ही कलाकार डेलनाझ ईरानी हिला देखील कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती 'कभी कभी इत्तेफाक से' या मालिकाचे निर्माते यांनी दिली आहे. डेलनाझला कोरोना झाल्याची माहिती मिळताच इतर सहकलाकार यांना वेगवेगळे करत त्याची देखील कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. बीएमसीने सुचना दिल्यानंतर सेटला सॅनिटायझर करण्यात आले आहे. डेलनाझ सध्या विलगीकरणात असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.

अनेक टिव्ही कलाकारांना कोरोनाची लागण
मिळालेल्या माहितीनुसार, डेलनाझला कोरोना होण्यापुर्वी अनेक टिव्ही कलाकारांना कोरोनाची बाधा झाली होती. नुकतेच अर्जुन बिजलानी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, मला ओमॉयक्रॉनची लागण झाली आहे. अर्जुनबरोबर नकुल मेहता हा देखील कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. सोमवारी त्याची पत्नी आणि 11 महिन्यांची मुलगीला देखील कोरोना झाल्याची बातमी समोर आली आहे.

बातम्या आणखी आहेत...