आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Ekta Kapoor Had Given Advice To Become An Actor, Came To Films From Dharmendra's Production House, Then Went To Jail For Violence In Red Fort

चर्चेत होता पंजाबी अभिनेता:एकता कपूरने दिला होता अभिनेता होण्याचा सल्ला, धर्मेंद्रच्या प्रॉडक्शन हाऊसमधून झाली होती चित्रपटात एंट्री; लाल किल्ल्यावरील हिंसाचाराच्या आरोपात जावे लागले होते तुरुंगात

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2019 मध्ये दीपने राजकारणात प्रवेश केला होता.

पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा 15 फेब्रुवारी रोजी अपघाती मृत्यू झाला. दीप आपल्या मैत्रिणीसोबत प्रवास करत असताना हरियाणातील सोनीपतमधील खारखोडाजवळ KMP एक्स्प्रेसवेवर त्याच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात दीपचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेली त्याची मैत्रीण रीना राय हिला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. जाणून घेऊया कोण होता पंजाबी अभिनेता दीप-

दीपचा जन्म 2 एप्रिल 1984 रोजी पंजाबमधील मुक्तसर येथे झाला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर दीपने पंजाबमधील पटियाला विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले.

मॉडेलिंगच्या दिवसांमध्ये दीपने मुंबईचे लोकप्रिय डिझायनर हेमंत त्रिवेदी, रोहित गांधी यांच्यासाठी रॅम्प वॉक केला. 2011 मध्ये दीपने किंगफिशर मॉडेल हंट अवॉर्डही जिंकला होता.

मॉडेलिंगमध्ये रुची वाढल्यानंतर दीपने 2006मध्ये ग्रासिम मिस्टर इंडियामध्ये भाग घेतला आणि मिस्टर पर्सनॅलिटी आणि मिस्टर टॅलेंटेडचा किताब आपल्या नावी केला.

मॉडेलिंग करिअरमध्ये समाधानी नसल्यामुळे दीपने पुन्हा वकिली सुरू केली. सहारा इंडिया परिवारचा कायदेशीर सल्लागार म्हणून त्याने काम केले होते.

त्यानंतर त्याने डिस्ने, सोनी आणि हॉलिवूड स्टुडिओची खाती हाताळणाऱ्या ब्रिटिश लॉ फर्म हमंड्ससोबत काम केले.

तीन वर्षे दीपने बालाजी टेलिफिल्म्समध्ये लीगल हेड म्हणून काम केले होते.

बालाजीसोबत काम करत असताना एकता कपूरने दीपला अभिनयात हात आजमावण्याचा सल्ला दिला होता, पण त्यावेळी त्याने तिचे म्हणणे मनावर घेतले नव्हते.

अभिनेता धर्मेंद्र यांचे प्रॉडक्शन हाऊस विजेता फिल्म्सच्या बॅनरखाली दीपने रमता जोगी सेस या पंजाबी चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. पहिल्याच चित्रपटासाठी, दीपला बेस्ट मेल डेब्यूसाठी पीटीसी पंजाब चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

2016 मध्ये पदार्पण केल्यानंतर, दीप जोरा 10 नंबररिया (2017), रंग पंजाब (2018), साडे आले (2018), देसी (2019), जोरा आणि द सेकंड चॅप्टरमध्ये झळकला.

2019 मध्ये दीपने राजकारणात प्रवेश केला. सार्वत्रिक निवडणुकीत त्याने सनी देओलचा प्रचार केला. दीप हा सनी देओलचा जवळचा मित्र असल्याचे बोलले जात होते.

डिसेंबर 2020 मध्ये, शेतकरी संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सनी देओल आणि दीप संधू यांचा एक फोटो प्रसिद्ध केला होता, त्यात दावा केला होता की तिघेही देशभरातील शेतकरी आंदोलनाचे समर्थक आहेत. मात्र दीपने हा दावा चुकीचा असल्याचे सांगितले होते.

2021 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दंगल झाली होती. यादरम्यान काही शिखांनी लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडकावून गोंधळ घातला. या संपूर्ण प्रकरणात शेतकरी संघटनेने दीप संधू आणि लाखा सदाना हे मुख्य आरोपी असल्याचे सांगितले होते.

दीप आणि सदाना यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यामुळे दोघेही अनेक दिवस फरार होते. लाल किल्ल्यावर हिंसाचार केल्याबद्दल दीपला 9 फेब्रुवारी 2021 रोजी अटक करण्यात आली होती. चौकशीदरम्यान दीपने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले होते, त्यानंतर त्याचा जामीन मंजूर करण्यात आला होता.

जामीन मिळाल्यानंतर, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या तक्रारीनंतर लाल किल्ल्याचे नुकसान केल्याप्रकरणी दीपला पुन्हा अटक करण्यात आली होती. दुसऱ्यांदा दीपला 16 एप्रिल 2021 रोजी जामीन मिळाला होता.

या वर्षी सप्टेंबरमध्ये दीप सिद्धूने वारिस पंजाब दे नावाची राजकीय संघटना सुरू केली होती, जी केंद्र सरकारसोबत शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढेल.

15 फेब्रुवारी रोजी 37 वर्षीय अभिनेत्याचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. मंगळवारी दिल्लीहून पंजाबला जाताना दीप प्रवास करत असलेल्या कारची ट्रकला जोरदार धडक बसली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही धडक इतकी जबरदस्त होती, की गाडीच्या पुढील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघाताच्या वेळी दीप त्याची गर्लफ्रेंड रीना रायसोबत प्रवास करत होता. कुंडली-मानेसर-पलवल (केएमपी) एक्स्प्रेस वेवर पिपली टोलनाक्याजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातातून रीना राय थोडक्यात बचावली असून सध्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत.

बातम्या आणखी आहेत...