आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकता लग्न करणार?:45 वर्षीय एकता कपूरने मित्र तन्वीर बुकवालासोबतचा सेल्फी शेअर करुन निर्माण केला सस्पेन्स, म्हणाली - लवकरच मी तुम्हाला सर्व काही सांगेन !

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तन्वीर एक लेखक असून डिंग एंटरटेनमेंटचा संस्थापकही आहे.

टेलिव्हिजन क्वीन आणि निर्माती एकता कपूर हिच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे तिच्या लग्नाची चर्चा रंगू लागली आहे. एकताने सोशल मीडियावर तिचा मित्र तन्वीर बुकवालासोबतचा एक सेल्फी शेअर करताना लिहिले की - 'आणि आम्ही येथे आहोत! लवकरच मी तुम्हाला सर्व काही सांगेन !!!'

एकताने शेअर केलेल्या या फोटोवर तन्वीरने कमेंट केली, “या मैत्रीचे नात्यात रूपांतरित करण्याची वेळ आली आहे”. तन्वीरच्या सोशल मीडिया अकाउंटवर एकतासोबतचे त्याचे बरेच फोटो बघायला मिळतात. दोघांचे बॉन्डिंग बघता हे दोघे लग्न करणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. मात्र दोघांनीही अद्याप आपल्या नात्याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

तन्वीरने एकतासोबत काम केले आहे

तन्वीर एक लेखक असून डिंग एंटरटेनमेंटचा संस्थापकही आहे. एकताबरोबर त्याने 'फितरत' या वेब शोसाठी काम केले होते.

सरोगसीद्वारे झाली आई

45 वर्षीय एकताने अद्याप लग्न केले नसले तरी जानेवारी 2019 मध्ये ती सरोगेसीच्या माध्यमातून एका मुलाची आई झाली आहे. तिने आपल्या मुलाचे नाव रवी ठेवले आहे. हे तिचे वडील जितेंद्र यांचे खरे नाव आहे. एकताचा भाऊ तुषार कपूरनेही लग्न केलेले नाही. सरोगसीच्या माध्यमातून तो मुलगा लक्ष्यचा पिता झाला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser