आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाद:सचिन जोशीच्या कंपनीतील कर्मचा-यांचा आरोप - अनेक महिन्यांपासून पगार दिला नाही, आता लॉकडाऊनचा आश्रय घेत आहे

मुंबई (अमित कर्ण)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सचिनने दिले स्पष्टीकरण, म्हणाला - हा मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे

निर्माता सचिन जे. जोशीची कंपनी वायकिंग व्हेंचर्सच्या कर्मचा-यांनी त्याच्यावर अनेक महिन्यांचा पगार थकवल्याचा आरोप लावला आहे. कर्मचा-यांचा  आरोप आहे की, कंपनीने गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांना पगार दिला नाही. यासंदर्भात कंपनीच्या मॅनेजमेंटला विचारले असता, आम्हाला त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास सांगितले जात आहे. कर्मचा-यांच्या मते, पगारामध्ये गेल्या वर्षभरापासून अनियमितता सुरूच आहे. लॉकडाऊनमुळे आता कंपनी फंड नसल्याचे कारण सांगत आहे.

पगार न मिळाल्याने 30 जणांनी कंपनी सोडली आहे

सचिनच्या कंपनीचा पीआर बघितलेल्या तस्कीन नायक यांनी दैनिक भास्करशी बोलताना सांगितले की, 'सुमारे 30 जणांनी वायकिंग व्हेंचर्स सोडले आहे. यामाग सॅलरी न झाल्याचे कारण आहे. गेल्या वर्षभरात काही महिन्यांचाच पगार अकाऊंटमध्ये जमा झाला आहे. मलाही दोन महिन्यांचा पगार मिळालेला नाही. उर्वरित 30 जणांचा 4-4 महिन्यांचा पगार थकीत आहे. आमच्या वेतनाचे सुमारे 31 लाख रुपये शिल्लक आहेत, जे कंपनी देऊ इच्छित नाही."

आता लॉकडाऊनचे कारण पुढे करत थकबाकी देऊ इच्छित नाही

तस्कीन पुढे म्हणाले, "आता कंपनी आणि सचिन जोशी लॉकडाऊनचे कारण पुढे करत आहे, जेणेकरून त्यांना थकबाकी द्यावी लागणार नाही. आम्ही त्यांच्या एक्स सीईओसोबत जुळलो आहोत, असा आरोपही ते करत आहेत. हा आरोप खोटा आहे. त्यांच्याजवळ आमच्यावरील आरोपांची उत्तरेदेखील नाहीत. हे चक्र वर्षभरापासून चालू आहे आणि आता ते लॉकडाऊनच्या आश्रयाखाली आपले दुष्कर्म लपवत आहेत."

तस्कीन यांच्या म्हणण्यानुसार, 26 मार्च रोजी कंपनीने एक मेल पाठविला होता, त्यात 19 एप्रिल ते मेच्या पहिल्या आठवड्यात थकबाकी देण्यात येईल, असे नमूद करण्यात आले होते. सोबतच संकटाच्या या काळात सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. परंतु अद्याप कंपनीकडून थकबाकी चुकवण्यात आलेली नाही.

सचिनने दिले स्पष्टीकरण, म्हणाला - हा मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे

या संपूर्ण प्रकरणात सचिनचे स्पष्टीकरणही समोर आले आहे. त्याच्या मते, हे सर्व त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. जे तो कधीही यशस्वी होऊ देणार नाही. सचिन म्हणाला, “प्रत्येक कंपनीत नाखूष कर्मचारी असतात. आमच्या बाबतीत, मुठभर लोक माध्यमांचा वापर करून आमची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करीत आहेत.” 

सचिनचा दावा - हे प्रकरण जुन्या कंपनीशी संबंधित 

हे प्रकरण त्याने विकत घेतलेल्या परदेशी कंपनीशी संबंधित आहे, असा दावा सचिनने केला आहे. वायकिंग व्हेंचर्सने तुगबोट नावाची कंपनी विकत घेतली होती, नंतर त्याचे नाव बदलून थिंकटँक ठेवले गेले. तो म्हणतो, "थिंकटँकचा वाद सध्या कामगार न्यायालयात आहे आणि आम्हाला आमच्या न्यायालयीन प्रणालीवर पूर्ण विश्वास आहे." सचिनने सांगितल्यानुसार, त्यांची बदनामी करणार्‍या सर्व कर्मचार्‍यांना त्यांनी कायदेशीर नोटीस पाठविली आहे.

कर्मचार्‍यांवर दोन ठिकाणी काम केल्याचा आरोप

सचिनने सांगितले, "या करारानुसार ही कंपनी (थिंकटँक) महसूलच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल आणि आम्ही त्यांना पूर्ण आधार आणि पायाभूत सुविधा देऊ. पण ही कंपनी अडचणी आणि देणी परत करण्याच्या चक्रात अडकली होती.  कर्मचा-यांचे दोन ठिकाणी काम करण्यापासून ते पैशांची अफरातफर पर्यंत, अनेक अडचणी होत्या, ज्या त्यांनी सोशल मीडियावर मान्यही केल्या.  एकदा या अडचणी संपुुष्टात आल्या की लोकांचे पैसेही देण्याचा प्रश्न सुटेल.'

आमच्याकडे पुरावा म्हणून आहेत कर्मचार्‍यांची पत्रे  

सचिन पुढे म्हणाला, "आमच्याकडे कर्मचार्‍यांची पत्रे आहेत, ज्यात त्यांनी एकाच वेळी दोन ठिकाणी काम करत असल्याचे मान्य केले आहे. त्यांनी आमच्याविरुद्ध मुंबईतील एका वृत्तपत्राची मदत घेतल्याचा तपास आम्ही करत आहोत. त्यानंतर, लॉकडाऊन जाहीर केले गेले. आता ते मीडियाचा वापर करुन पुन्हा आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. कायदेशीर लढाई लढण्यास आम्हाला कोणतीही अडचण नाही, परंतु मीडियाचा वापर करुन आमची प्रतिमा खराब करण्याच्या या प्रयत्नाविरूद्ध आम्ही कायदेशीर कारवाई करू.'

बातम्या आणखी आहेत...