आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरमध्ये झालेल्या दगडफेकीवर इम्रान हाश्मीची प्रतिक्रिया:म्हणाला- मला दुखापत झाल्याचे वृत्त चुकीचे आहे

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी सध्या काश्मीरमध्ये 'ग्राउंड झिरो' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. त्यादरम्यान या चित्रपटाच्या टीमवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. पहलगाम येथील मार्केटमध्ये हा प्रकार घडल्याचे दिसून आले आहे. आता या बातमीवर इम्रानने प्रतिक्रिया दिली असून संपूर्ण सत्य चाहत्यांना सांगितले आहे.

माझ्या दुखापतीची बातमी चुकीची आहे
इम्रानने एक ट्विट करत त्याला दुखापत झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. इम्रानने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, 'काश्मीरचे लोक खूप प्रेमाने स्वागत करतात. श्रीनगर आणि पहलगाममध्ये खूप छान शूटिंग झाले. दगडफेकीच्या घटनेत मी जखमी झाल्याचे वृत्त खोटे आहे,' असे तो म्हणाला आहे. पण क्रू मेंबर्सपैकी कोणाला दुखापत झाली आहे की नाही हे त्यांने सांगितले नाही.

इम्रानची सोशल मीडिया पोस्ट.
इम्रानची सोशल मीडिया पोस्ट.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया
इम्रानचे ट्विट समोर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. एका चाहत्याने लिहिले, देवाची कृपा आहे. हे वृत्त चुकीचे आहे, सुरक्षित राहा इम्रान, असे म्हटले आहे.

चित्रपटात लष्कर अधिका-याच्या भूमिकेत
'ग्राउंड झिरो' या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस देऊस्कर करत आहेत. या चित्रपटात इम्रान हाश्मीसोबत सई ताम्हणकर आणि झोया हुसैन देखील दिसणार आहेत. हा चित्रपट म्हणजे एक मिलिटरी ड्रामा आहे. या चित्रपटात इम्रान हाश्मी एका लष्कर अधिकारीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सई ताम्हणकर या चित्रपटात इम्रान हाश्मीच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.

'टायगर 3' मध्ये दिसणार प्रमुख भूमिकेत
इम्रानच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच अक्षय कुमारसोबत 'सेल्फी' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तो सलमान खानच्या 'टायगर 3' या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...