आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Enforcement Directorate (ED) Is Questioning Bollywood Actress Jacqueline Fernandez In Delhi For The Last Five Hours, In A Money Laundering Case

ईडीची चौकशी:मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकली जॅकलीन फर्नांडिस, दिल्लीमध्ये ईडी 5 तासांपासून करत आहे चौकशी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुकेशवर मनी लाँड्रिंग अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकत असल्याचे दिसत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गेल्या 5 तासांपासून तिची दिल्लीत चौकशी करत आहे. मनी लाँडरिंग प्रकरणी तिचा जबाब घेतला जात आहे. हे प्रकरण कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर यांच्याशी संबंधित आहे. सुकेशवर मनी लाँड्रिंग अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

दुसरीकडे, ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेता अरमान कोहलीची कोठडी 1 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. काही वेळापूर्वी त्याला ड्रग पॅडलर अजय सिंहसह विशेष एनडीपीएस कोर्टात हजर करण्यात आले होते.

सुरुवातीच्या अहवालांनुसार, एजन्सी अभिनेत्री जॅकलिनची अनेक कोटींच्या खंडणी रॅकेट संदर्भात चौकशी करत आहे. हे प्रकरण सुकेश चंद्रशेखर यांच्याशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. ज्यांच्यावर आधीच मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वी, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) लॉन्ड्रिंग प्रकरणात यामी गौतमलाही समन्स बजावले होते आणि अभिनेत्रीचीही 7 जुलै रोजी चौकशी करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...