आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत केसमधील मनी लाँडरिंग प्रकरण:ईडीने रिया, तिचा भाऊ आणि वडिलांचा मोबाइल फोन केला जप्त, तपासात सहकार्य करत नसल्याने चौकशीसाठी लागतोय बराच वेळ

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ईडीने सोमवारी रिया, तिचे वडील आणि भावाची साडेदहा तास चौकशी केली.
  • अहवालानुसार ईडी अद्याप या प्रकरणातील महत्त्वपूर्ण पुराव्यांचा शोध घेत आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजित आणि भाऊ शोविक यांची सुमारे साडेदहा तास चौकशी केली. सकाळी अकराच्या सुमारास ते ईडी कार्यालयात पोहोचले आणि रात्री साडेनऊच्या सुमारास ते कार्यालयाबाहेर पडले. रिपोर्टनुसार ईडीने रिया, तिचे वडील आणि भाऊ यांचे मोबाइल फोन आपल्या ताब्यात घेतले आहेत. तिन्ही फोनची चौकशी केली जाईल. बुधवारी, त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलवले जाऊ शकते.

  • रिया आणि शोविक यांची प्रदीर्घ चौकशी का सुरु आहे?

रिया चक्रवर्तीची दोन राऊंडमध्ये सुमारे 19 तास चौकशी झाली. त्याचवेळी तिचा भाऊ शोविकची तीन राऊंडमध्ये सुमारे 33 तास चौकशी केली गेली. ईडीशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिया आणि शोविक तपासात ईडीला सहकार्य करत नव्हते आणि प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत नव्हते. म्हणूनच त्यांच्या चौकशीसाठी इतका वेळ लागला.

  • रिया आणि शोविकची कधी आणि किती वेळ चौकशी केली गेली
नावकधी झाली चौकशीकिती तास झाली विचारपूस
रिया चक्रवर्ती7 आणि 10 ऑगस्टसाडे आठ तास आणि साडे दहा तास
शोविक चक्रवर्ती7, 8 आणि 10 ऑगस्ट5, 18 आणि साडे दहा तास
  • काय काय विचारले गेले?

रिपोर्ट्सनुसार, रियाला सुशांतसोबतच्या नात्यापूर्वी आणि नंतर तिच्या उत्पन्नाच्या स्त्रोताबद्दल विचारले गेले. तिला गेल्या काही वर्षातील (विशेषत: 2019 आणि 2020) चल मालमत्ता, दागदागिने, गुंतवणूक आणि विकत घेतलेल्या मालमत्तेचा हिशोब मागितला गेला. रियाचा भाऊ शोविक आणि वडील इंद्रजित यांना त्यांच्या कमाईबद्दल प्रश्न विचारले गेले. असे सांगितले जात आहे की सुशांतच्या वडिलांनी केलेल्या आरोपांवर ईडीला अद्याप फारसे यश मिळाले नाही. एजन्सी अद्याप या प्रकरणात महत्त्वपूर्ण पुरावे शोधत आहे.

सुशांतचे वडील केके सिंह यांनी आपल्या मुलाच्या खात्यातून 15 कोटी रुपये काढून घेतल्याचा आरोप रिया आणि तिच्या कुटुंबावर केला. त्यांनी पाचण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये रियाचे कुटुंबीय, सुशांतसोबत काम करणारे सॅम्युएल मिरांडा आणि श्रुती मोदी यांच्याद्वारे ही रक्कम संशयास्पद खात्यात हस्तांतरित केल्याचा आरोप केला आहे.

  • रियाने सुशांतचे सर्व निर्णय घेतले

सुशांतचे माजी मॅनेजर श्रुती मोदीने ईडीच्या अधिका-यांना सांगितले की, सुशांतचे सर्व निर्णय रियाने घेतले होते. मग ते त्याच्या व्यवसायाशी संबंधित असो किंवा इतर कोणाशीही, सर्व निर्णय हे रियाचे असायचे. सोमवारी ईडीकडून श्रुतीची सुमारे साडेदहा तास चौकशी झाली. मंगळवारीही तिला ईडी कार्यालयात बोलविण्यात आले.

  • सिद्धार्थ पिठानी जास्त बोलू शकला नाही

सोमवारी ईडीने सुशांतच्या रुममेट आणि मित्र सिद्धार्थ पिठानीची सुमारे 7 तास चौकशी केली. सूत्रांच्या माहितीनुसार, तो बरेच काही सांगू शकला नाही. सोमवारी दुपारी तो ईडी कार्यालयात पोहोचला आणि मध्यरात्रीपर्यंत त्याची चौकशी सुरु होती. पिठानी हा सुशांतचा क्रिएटिव्ह मॅनेजरही होते. तो त्याच्या व्हर्चुअल रिअॅलिटी बेस्ट प्रोडक्टसाठी कंटेट तयार करण्यात सुशांतला मदत करत होता. मंगळवारी पुन्हा एकदा त्याला चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...