आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरणाची व्याप्ती वाढली:ईडीने बिहार पोलिसांना एफआयआरची प्रत मागितली, मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल होऊ शकतो; बिहार पोलिसांनी सुशांतच्या बँक खात्याचीही चौकशी केली

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता ईडीदेखील या प्रकरणाची चौकशी करत आहे.
Advertisement
Advertisement

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी 46 दिवसानंतर मोठी पावले उचलली जात आहेत. आता या प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली असून ईडीसुद्धा या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे वृत्त आहे. मुंबई आणि पाटणा पोलिसांनंतर सुशांतच्या प्रकरणाची चौकशी करणारी ही तिसरी एजन्सी आहे. सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या एफआयआरचा तपशील मंगळवारी ईडीने मागवला आहे. रिया चक्रवर्तीने सुशांतच्या बँक खात्यातून एकूण 15 कोटी रुपये काढल्याचा आरोप सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

या प्रकरणातील नवीन घडामोडीबद्दल सूत्राने दिलेली माहिती अशी की, पुढील चौकशीसाठी ईडी आता एफआयआरचा सखोल तपास करेल. पाटणा पोलिसांना पाठवलेल्या पत्रात ईडीने सुशांत सिंह राजपूतच्या सर्व बँक खात्यांचीही माहिती मागितली आहे.

  • स्टार्ट अप आणि पैसे हस्तांतरण हे चौकशीचे कारण बनले

सुशांत सिंह राजपूतच्या बँक खात्याबद्दल माहिती मिळविण्यासाठी पाटणा पोलिस गुरुवारी मुंबईच्या वांद्रे येथील कोटक महिंद्रा बँकेत पोहोचले होते. सुशांतच्या वडिलांचा आरोप आहे की, सुशांतच्या बँक खात्यातून 15 कोटी रुपये तीन बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले आहेत. ही बँक खाती रिया, तिचा भाऊ शोविक आणि तिची आईची आहेत. रिलेशनशिपमध्ये असणार्‍या सुशांत आणि रियाने एकाच वेळी तीन स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक केली होती.

Advertisement
0