आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या नैराश्येचे कारण चित्रपट न मिळणे हे सांगितले जात आहे. याचदरम्यान बॉलिवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यामध्ये करण जोहर आणि सलमान खानचे नाव समोर येत आहे. या प्रकरणी सलमान खान, करण जोहर आणि एकता कपूर यांच्यासह 8 जणांविरोधात बिहारमध्ये खटला दाखल करण्यात आला आहे. सततच्या टीकेमुळे आता करण जोहरने आपला फोन नंबर बदलला असून त्याने ट्विटरवरुन अनेक जवळच्या मित्रांना अनफॉलो केले आहे. यावरुन तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
करण जोहरने आपला फोन नंबर का बदलला?
बिहारच्या पाटण्यात जनतेने केवळ संताप व्यक्त केला नाही तर सलमान आणि करण यांचे पुतळे जाळून त्यांचा निषेध केला आहे. सुशांतच्या चाहत्यांमध्ये करण जोहरबद्दल खूप राग आहे. सुशांतच्या निधनानंतरही करण जोहर सतत सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. हे टाळण्यासाठी त्याने अलीकडेच आपला फोन नंबर बदलला.
करण जोहरने सुशांत सिंह राजपूतची प्रमुख भूमिका असलेल्या ड्राइव्ह या चित्रपटाची निर्मिती केली ज्यात जॅकलिन फर्नांडिस देखील आहे. पण दोन वर्षे हा चित्रपट रखडला आणि नंतर तो थिएटरऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला. आता प्रश्न हा आहे की, एकीकडे करण जोहरला सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येबद्दल जबाबदार ठरवले जात असताना अचानक त्याने आपला फोन नंबर बदलला, त्यामुळे आता एक वेगळीच कहाणी समोर येत आहे.
ट्विटरवरील मित्रांना केले अनफॉलो
सुशांतच्या चाहते करण जोहरला त्याच्या मृत्यूसाठी दोष देत आहेत. सोशल मीडियावरील कमेंट्स आणि ट्विटनंतर करणने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अनेकांना अनफॉलो केले आहे. आलिया भट्ट, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि काजोलसह अनेकांना त्याने अनफॉलो केले आहे. सध्या करण काही प्रोडक्शन हाऊस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अक्षय कुमार यांच्यासह केवळ 8 जणांनाच फॉलो करत असल्याचे त्याच्या ट्विटर हँडलवर दिसत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.