आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांचा संशय:सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या ईमेल आयडीचा गैरवापर करत होती रिया चक्रवर्ती, पासवर्ड बदलण्याचाही केला प्रयत्न

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांना संशय आहे की, सुशांतच्या निधनानंतर रिया चक्रवर्तीने त्याच्या ईमेलचा वापर करुन त्यासोबत छेडछाड केली.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी बिहारमध्ये गुन्हा दाखल होताच प्रकरणाला वेग आला आहे. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर आपल्या मुलाच्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आणि त्यानंतर रिया वादाच्या भोव-यात सापडली. आता टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार सुशांतच्या मृत्यूनंतरही रिया त्याचे ईमेल अकाउंट वापरत होती.

पोलिसांना संशय आहे की, सुशांतच्या निधनानंतर रिया चक्रवर्तीने त्याच्या ईमेलचा वापर करुन त्यासोबत छेडछाड केली. सोबतच रियाने पासवर्ड बदलण्याचा देखील प्रयत्न केला, अशीही शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. अद्याप याची पुष्टी झालेली नाही.

  • सर्व डेटा पुनर्प्राप्त केला जाऊ शकतो

टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत राजकीय विश्लेषक रवी श्रीवास्तव म्हणाले की, रिया सुशांतचे ईमेल अकाउंट वापरत असल्याचे प्रत्येकाचे म्हणणे आहे. जरी तिने त्यात काही छेडछाड केली असली तरी प्रत्यक्षात इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमधून काहीही कायमचे हटविले जात नाही. ते नेहमी पुनर्प्राप्त केले जाऊ शकते.

  • रियाने 8 जूननंतर सुशांतला ब्लॉक केले होते

सुशांतच्या घरात काम करणा-या नीरजने आपल्या जबाबात सांगितले की, रिया चक्रवर्तीने 8 जून रोजी तिचे सर्व सामान घेऊन सुशांतचे घर सोडले होते. चॅनलनुसार आता असे सांगितले जात आहे की, 8 जून ते 13 जून या कालावधीत सुशांतने रियाला बर्‍याच वेळा फोन केला होता पण रियाने त्याचा नंबर ब्लॉक केल्याने त्याचा कॉल कनेक्ट होऊ शकला नाही. यापूर्वी सुशांतच्या बहिणीने रियावर आरोप केले होते की, 8 जून रोजी रिया सुशांतची औषधे, क्रेडिट कार्ड आणि आवश्यक वस्तू घेऊन घराबाहेर पडली होती, यामुळे तो अस्वस्थ झाला होता.

बातम्या आणखी आहेत...