आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्यनला आजही जामिन मिळणे कठीण:ड्रग्ज प्रकरणात NCB रिमांड वाढवण्याच्या तयारीत, मेट्रोपॉलिटन कोर्टाकडे जामिन देण्याचा अधिकार नाही

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुक्रवारी गौरी खानचा 50 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आयोजित पार्टी आणि सेलिब्रेशन रद्द झाले आहे.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात आज दुपारी 2 वाजता मुंबईच्या मेट्रोपॉलिटिन कोर्टात हजर करण्यात आले आहे, पण आजही आर्यनला जामिन मिळण्याची फारशी आशा दिसत नाहीये. एनसीबी चौकशीसाठी कोठडीत मुदतवाढ मागणार आहे, कारण या प्रकरणात अलीकडेच परदेशी नागरिकालाही अटक करण्यात आली आहे, ज्यामुळे ड्रग्ज रॅकेटमध्ये इंटरनॅशनल कनेक्शनच्या थिअरली आणखी बळकटी मिळाली आहे. त्यामुळे एनसीबीला चौकशीसाठी अधिक वेळ हवा आहे.

दुसरीकडे, मेट्रोपॉलिटिन कोर्ट हे विशेष न्यायालय आहे आणि या न्यायालयाला एनडीपीसी कायद्यांतर्गत जामिन देण्याचा अधिकार नाही. अशा परिस्थितीत, आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांचा प्रयत्न असेल की, कोर्टाने आर्यनचा रिमांड संपवून त्याला तुरुंगात पाठवण्याचा आदेश जारी करावा. जेणेकरून आर्यन शुक्रवारी उच्च न्यायालयात जामिनासाठी अपील करू शकेल.

गुरुवारी आर्यन खानला पुन्हा वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आले. वैद्यकीय चाचणीनंतर 2 वाजता न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. आज या प्रकरणावर दीर्घ युक्तिवाद होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जातोय. एनसीबी नवीन पुरावे आणि आणखी काही लोकांना ताब्यात घेतल्याचे सांगत आर्यनची कोठडी वाढवण्याचा प्रयत्न करेल.

उद्या होणारी गौरी खानची 50 वी बर्थडे पार्टी रद्द
आर्यनची आई गौरी खानचा शुक्रवारी 50 वा वाढदिवस आहे. आर्यनच्या अटकेपूर्वी गौरीचा वाढदिवसाच्या निमित्ताने एका जंगी पार्टीचे आयोजन करण्याचे प्लानिंग होते. मन्नतमध्ये मोठी पार्टी आयोजित करण्यात येणार असल्याची चर्चाही होती. पण आर्यनच्या अटकेनंतर सेलिब्रेशन रद्द करण्यात आले आहे. जर आर्यनच्या कोठडीत आज वाढ झाली नाही आणि त्याला जर शुक्रवारी जामिन मिळाला, तर गौरीसाठी ही सर्वात मोठी वाढदिवसाची भेट असेल.

क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात आतापर्यंत 17 जणांना अटक करण्यात आली आहे

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत 17 लोकांना अटक केली आहे. यापैकी 8 लोक 7 ऑक्टोबरपर्यंत आणि 8 आरोपी 11 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या कोठडीत आहेत. आर्यन व्यतिरिक्त त्याचा मित्र अरबाज मर्चंट, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा, इश्मीत सिंग चड्ढा, मोहक जैस्वाल, मुनमुन धामिचा आणि नुपूर सतिजा यांची कोठडीही आज संपत आहे. या प्रकरणात अधिकाऱ्यांनी कोकेन, मेफेड्रोन, चरस, हायड्रोपोनिक आणि एमडीएमए सारखे अनेक ड्रग्ज आणि 1.33 लाख रुपये रोख जप्त केले आहेत.

आरोपी मोहक जैस्वालची चौकशी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी मुंबईतील जोगेश्वरी येथे छापा टाकला आणि अब्दुल कादिर शेखला 3 ऑक्टोबर रोजी मेफेड्रोनसह अटक केली. एनसीबीचा दावा आहे की आरोपी इश्मीत सिंग चड्ढाची चौकशी केल्यानंतर त्यांनी 4 ऑक्टोबर रोजी गोरेगाव येथील रहिवासी श्रेयस सुरेंद्र नायरला चरससह अटक केली.

NDPS कलमांखाली झाली अटक
आर्यनला एनडीपीएसच्या कलम 8 सी, 20 बी आणि 27, 35 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. ड्रग्ज घेण्यासाठी कलम 8C लावले जाते. नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सब्सटेंस अॅक्ट, 1985 (एनडीपीएस) हा ड्रग्जशी संबंधित कठोर कायदा आहे. त्याच्या कलम 27 अंतर्गत जर कोणी अंमली पदार्थ घेत असेल तर तो गुन्हा आहे.

या कलमाच्या कलम (A) मध्ये असे म्हटले आहे की, कोकेन, मॉर्फिन सारख्या प्रतिबंधित मादक पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या व्यक्तीला एक वर्षाची शिक्षा किंवा 20,000 रुपये दंड, किंवा दोन्हीची शिक्षा होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...