आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KGF स्टार यशचा वाढदिवस:आजही बस ड्रायव्हर आहेत यशचे वडील, अभिनेता होण्यासाठी सोडले होते शिक्षण-घर, 250 कोटींचा चित्रपट देणारा कन्नडचा आहे पहिला स्टार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बस ड्रायव्हरचा मुलगा आहे यश

कन्नड अभिनेता यश आज आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक नजर टाकुयात त्याच्याशी संबंधित खास गोष्टींवर -

मोठी फॅन फॉलोइंग असलेल्या यश मुळचा कर्नाटकच्या हासन जिल्ह्यातील आहे. जन्म 8 जानेवारी 1986 रोजी त्याचा जन्म झाला. त्याचे खरे नाव नवीन कुमार गौडा असे आहे. त्याचे वडील कर्नाटक राज्य परिवहन बस सेवेत बस चालक आहेत. यशने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याचे वडील अजूनही बस चालवतात. केजीएफच्या प्री रिलीज इव्हेंटमध्ये एसएस राजामौली म्हणाले होते की, यशचे वडील बस ड्रायव्हर असल्याचे समजल्यावर मला आश्चर्य वाटले होते. माझ्या नजरेत यशपेक्षा त्याचे वडील एक मोठे स्टार आहेत.

यशला बालपणापासूनच अभिनयात रुची होती. एकदा शालेय कार्यक्रमात त्याने चित्रपटातील एक दृश्य सादर केले होते, ज्यासाठी त्याचे बरेच कौतुक झाले होते. त्यानंतर त्याने अभिनेता होण्याचा निश्चय केला. 12 वीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर यश अभिनयात करिअर करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बेंगळुरु येथे आला आणि येथील लोकप्रिय बिनाका थिएटर ट्रूपमध्ये सामील झाला.

यशचे कुटुंब सुरुवातीला त्याच्या निर्णयाविरोधात होते. जेव्हा यशने मैसूर येथे शिक्षण सोडून बंगळुरु येथे जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्याचे आईवडील त्याच्यावर रागावले होते. त्यांनी यशसोबतचे सर्व संबंध तोडण्याची धमकी दिली होती आणि पुन्हा कधीही घरात पाऊल ठेऊ नको, असे ठणकावले होते. पण आज यशच्या कुटुंबीयांना त्याचा अभिमान वाटतो.

आज यशने सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असली तरी त्याला यासाठी त्याचा बराच संघर्ष करावा लागला. त्याने बॅकग्राऊंड आर्टिस्ट, स्टेज मॅनेज, लाइट मॅनेज करण्यासारखी अनेक लहान मोठी कामे केली. त्यानंतर त्याला चित्रपटात असिस्टंट डायरेक्टर व्हायची संधी मिळाली होती.

यशने आपल्या करिअरची सुरुवात नंद गोकुला या मालिकेद्वारे केली होती. याशिवाय तो इतर काही मालिकांमध्ये झळकला. यश एका रात्रीतून स्टार झालेला नाही. त्याने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक लहान मोठ्या भूमिका केल्या.

यश गेल्या दशकभरातील कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणा-या कलाकारांपैकी एक आहे. कन्नड सिनेमामधील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक असलेल्या केजीएफच्या यशानंतर यश प्रत्येक चित्रपटासाठी 15 कोटी रुपये मानधन घेतो.

यश हा पहिला कन्नड अभिनेता आहे ज्याच्या केजीएफ या चित्रपटाने 200 कोटींचा व्यवसाय केला.

यशने अभिनेत्री राधिका पंडितशी लग्न केले असून त्यांना दोन मुले आहेत. टीव्ही शो नंद गोकुलाच्या सेटवर राधिका आणि यश पहिल्यांदा भेटले. दोघेही गरिबांच्या मदतीसाठी राधिका यशो मार्ग फाउंडेशन चालवते.

बातम्या आणखी आहेत...