आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाखत:प्रत्येक दिवस शेवटचा समजून जगतो, चाहत्यांच्या मते हीच माझी सर्वात मोठी ऊर्जा

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणवीर सिंहचा चित्रपट ‘जयेशभाई जोरदार’ या 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. दिव्य मराठीशी झालेल्या मुलाखतीत रणवीरने चित्रपट, व्यक्तिमत्त्वात बदल आणि सहकाऱ्यांसोबतच्या बाँडिंगविषयी चर्चा केली...

रणवीर सांगतो..., मी प्रत्येक पात्रासाठी शारीरिक बदलाचे प्रयत्न करत असतो. माझ्या प्रत्येक पात्राची तयारी तेथुनच होते. जोपर्यंत शारीरिक बदल होत नाही तोपर्यंत मी ते फील करू शकत नाही. उदा- अल्लाउद्दीन खिलजीचे पात्रे जेव्हा साकारत होतो तेव्हा पूर्ण आहारात बदल केला होता. त्यानंतर ‘गली बॉय’चे शूटिंग केले, तेव्हा जितके वजन वाढले होते ते सर्व कमी केले. कारण ‘गली बॉय’मध्ये मी वस्तीतला मुलगा वाटावा, असे जोयाचे म्हणणे होते. नंतर ‘83’च्या शूटिंगमध्येही मी लूक बदलला होता.

जयेशभाई’साठी सुमारे 10 किलो वजन कमी केले
जयेशभाई जोरदार’च्या वर्कशॉपमध्ये बोमनसाहेबांच्या व्यक्तिरेखेबद्दल मला कधी भीती वाटली नाही. मला वजन कमी करण्याचे सांगण्यात आले होते. मग मी दोन आठवडे सुटी घेऊन वजन कमी केले, जेणेकरून पिता-पुत्राचे पात्र चांगले दिसावे. त्यानंतर मी माझा आहार बदलला. यादरम्यान फुटबॉल, बॅडमिंटन, बास्केटबॉल, स्क्वॉश खेळू लागला. मी सुमारे 10 किलो कमी केले.

माझ्या अभिनयात खूप बदल झाला...
रणवीर पुढे सांगतो...,‘बँड बाजा बारात’पासून ते ‘जयेशभाई जोरदार’पर्यंत माझ्या अभिनयात आता खूप बदल झाला आहे. मी जेव्हा ‘जयेशभाई जोरदार’ पाहिला, तेव्हा मला वाटले, यार, दहा वर्षांत मुलगा काहीतरी शिकला. पूर्वी मी खूप कच्चा होतो, आता मी एक कुशल अभिनेता झालो. आता मागणीनुसार मी कोणतेही भावनिक दृश्य करू शकतो. पहिल्यांदाच स्वत:ची क्षमता वाढताना पाहिली.

भविष्यावर विश्वास नाही, जे आहे ते आजच आहे..
रणवीर म्हणतो..., ‘जेव्हा मला माझ्या हाय एनर्जीविषयी विचारले जाते, तेव्हा मला नेहमी वाटते, आपले जीवन समान आहे. माझा भविष्यावर विश्वास नाही. उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नसते. उद्या काहीही होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक दिवस हा आपला शेवटचा दिवस असल्यासारखे जगतो. मी दररोज या विचाराने जगतो. उद्या काय होईल, याची माहिती नसते. मी चित्रपट करत असतानाही हे तत्त्वज्ञान कायम जपतो.

शूटिंगदरम्यान शालिनीची खोड काढायचो...

शूटिंगदरम्यान शालिनीची खोड काढायचो...
शूटिंगदरम्यान शालिनीची खोड काढायचो...

रणवीरने सांगितले, ‘जयेशभाई...’ची स्क्रिप्ट छान झाली होती, ते वाचून दिव्यांग ठक्करचे कौतुक करावे वाटले. 10-15 दिवसाच्या आतच माझे संवाद फिक्स झाले होते. मी देखील होकार दिला होता. शालिनी यात मुख्य भूमिकेत असल्याचे मला सांगण्यात आले होते. माझ्यासोबत काम करण्यास ती सहज व्हावी म्हणून मी तसा प्रयत्न केला. मी सीनियर असल्याचे तिला कधी भासू दिले नाही. शिवाय मी तिची बऱ्याचदा फिरकीही घेतली. पण माझ्या मनात तिच्यासाठी खूप प्रेम आहे. माझा आशीर्वाद तिच्यासोबत आहे. पुढे चालूनही ती असेच चांगले काम करेल.

दीपिकाचा सल्ला माझ्यासाठी महत्त्वाचा असतो.
दीपिकाचा सल्ला माझ्यासाठी महत्त्वाचा असतो.

दीपिकाचा सल्ला माझ्यासाठी महत्त्वाचा असतो...
अनेकदा लोक मला विचारतात, दीपिका आणि तुम्ही एकमेकांचे चित्रपट पाहिल्यानंतर काय प्रतिक्रिया देतात? यावर मी म्हणेन की, दीपिकाचे मत माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. ती आपले मत अतिशय प्रामाणिकपणे मांडते. माझ्या आयुष्यातील वर्तुळ खूप लहान आहे. माझा त्या मंडळातील प्रत्येक व्यक्तीवर खूप विश्वास आहे. दीपिकाला जे काही आवडते आणि आवडत नाही ते मोकळ्या मनाने सांगते. तिचा सिनेमातील अनुभव इतका चांगला आहे. त्यामुळे काय चांगलं आणि काय वाईट ते सांगू शकते. ते माझ्यासाठी फायद्याचे आहे.

बातम्या आणखी आहेत...