आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोण आहे मरीना?:तीन वर्षांपूर्वी उघडले होते राम रहीमचे रहस्य , म्हणाली होती - चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने बेडरुममध्ये घेऊन गेला होता

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मॉडेलिंग करणारी मरीना बोल्ड फोटोशूट्ससाठीही ओळखली जाते.

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमने टी-सीरिजचे मालक भूषण कुमार यांना म्युझिक इंडस्ट्रीतील माफिया म्हटले आहे. 'तू चुकीच्या माणसाशी पंगा घेतलास. मरीना कुंवर लक्षात आहे ना? ती का बोलली आणि नंतर तिने माघार का घेतली हे मला नाही माहित. हे माध्यमांना माहित आहे. तिचा व्हिडीओ माझ्याकडे आहे. जर तू माझ्याशी पंगा घेतलास तर तो व्हिडीओ मी माझ्या युट्यूब चॅनलवर पोस्ट करेन', अशा इशारा सोनूने भूषण कुमार यांना दिला आहे. 

'आज तक'ला दिलेल्या मुलाखतीत मरीनाने सांगितले होते की, भूषण कुमारने व्हिडीओत काम देण्याच्या नावाखाली घरी बोलावले आणि गैरवर्तणूक करण्याचा प्रयत्न केला होता. सोनूचा हा व्हिडीओ व्हायरल होताच मरीना अचानक चर्चेत आली आहे. डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमच्या बेकायदेशीर कृत्यांचा खुलासा केल्याने टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल मरीना तीन वर्षांपूर्वी चर्चेत आली होती.

ऑगस्ट 2017 मध्ये दोन साध्वींवर बलात्कार केल्याच्या आरोपात दोषी ठरल्याने न्यायलयाने डेरा प्रमुख राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. यानंतर, जेव्हा राम रहीमला तुरूंगवास झाला, तेव्हा मरीना कुंवरने त्याच्या बेकायदेशीर कृत्यांच्या पर्दाफाश केला होता. राम रहीमने तिला चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता आणि त्याच्या गुहेत नले होते, असे मरीनाने सांगितले होते.

  • सीआयडीमध्ये केलंय काम

मरीनाच्या अभिनयाबद्दल सांगायचे म्हणजे, तिने सीआयडी, आहट, शपथ, जग्गु दादा या शोमध्ये काम केले. 2017 मध्ये, असेही वृत्त आले होते की, ती अक्षय कुमारसोबत 'मिलियन डॉलर बेबी'च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे, मात्र हा प्रोजेक्ट पुढे जाऊ शकला नाही. मॉडेलिंग करणारी मरीना बोल्ड फोटोशूट्ससाठीही ओळखली जाते.

  • 2016 मध्ये झाले ब्रेकअप

मरीना टीव्ही अभिनेता मयूर वर्मासोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र 2016 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. मरीना अजूनही मयूरला आपला चांगला मित्र मानते आणि त्याचे कार्यक्रम बघते. सोबतच त्याच्या कामाचे ती कौतुकही करते. या दोघांनाही बिग बॉसच्या नवव्या पर्वाची ऑफर देण्यात आली होती. या शोच्या एका टास्क दरम्यान मरीना प्रिन्स नरुला आणि ऋषभ सिन्हासोबत दिसली होती.

0