आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Ex Boyfriend Himansh Kohli's Reaction On Neha Kakkar And Rohan Preet's Wedding, Said 'She Is Moving Forward In Life, It Is A Pleasure For Me'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी सुरुवात:नेहा कक्कर आणि रोहन प्रीतच्या लग्नावर एक्स-बॉयफ्रेंड हिमांश कोहली म्हणाला - 'जर नेहा लग्न बंधनात अडकणार असेल तर मला आनंदच होईल'

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एक्स बॉयफ्रेंड हिमांश कोहलीने प्रतिक्रिया देताना नेहाच्या लग्नाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

लोकप्रिय गायिका नेहा कक्कर सध्या तिच्या लग्नाच्या बातमीमुळे चर्चेत आहे. रिपोर्ट्सनुसार नेहा 23 ऑक्टोबर रोजी राइजिंग स्टार फेम रोहन प्रीत सिंगसोबत लग्न करणार आहे. परंतु, मात्र यावर अद्याप दोन्ही कुटुंबाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, नेहा कक्करचा एक्स बॉयफ्रेंड हिमांश कोहलीने प्रतिक्रिया देताना नेहाच्या लग्नाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

अलीकडेच टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना हिमांश म्हणाला, ‘जर नेहा लग्न बंधनात अडकणार असेल तर मला आनंदच होईल. ती जुन्या गोष्टी विसरून तिच्या आयुष्यात पुढे जात आहे. तिच्या आयुष्यात दुसरी कोणी तरी व्यक्ती आली आणि नेहा त्याच्यासोबत आनंदी आहे हे पासून मला आनंद झाला आहे’ असे हिमांशू म्हणाला.

नेहा - हिमांश 4 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते

हिमांश आणि नेहाच्या ब्रेकअपनंतर दोघांची बरीच चर्चा झाली होता. नेहा ब्रेकअपनंतर पुरती कोलमडली होती. इंडियन आयडॉलच्या शूटिंगदरम्यान ती खूप रडायची. या विषयी हिमांश म्हणाला, 'जे झाले ते झाले. मी त्या गोष्टी बदलू शकत नाही. मी अजूनही तिचा आदर करतो. वेळ जरी वाईट असेल तरी आपण दुसऱ्यांविषयी वाईट विचार करता कामा नये. ती उत्तम गायक असून एक व्यक्ती म्हणूनही चांगली आहे. यापुढील आयुष्यात तिला आनंद, सुख, समाधान मिळो अशी माझी इच्छा आहे.'

2014 पासून नेहा कक्कर आणि हिमांश चार वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. लवकरच दोघे लग्न करणार असल्याची बातमीही आली होती. पण यादरम्यान त्यांचे ब्रेकअप झाले होते. यानंतर नेहाचे नाव आदित्य नारायणशीही जोडले गेले. आदित्य हा इंडियन आयडॉलचा होस्ट तर नेहा परीक्षक होती. मात्र त्यांच्या लग्नाची बातमी ही केवळ इंडियन आयडॉलची प्रमोशनल स्ट्रॅटेजी असल्याचे म्हटले गेले होते.

स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, या दोघांच्या रिलेशनशिपला फार काळ झालेला नाही. काही महिन्यांपूर्वीच नेहा कक्करच्या 'आजा चल व्याह करवाएं, लॉकडाउन विच कत्त होने खर्चे' या गाण्याच्या सेटवर दोघांची भेट झाली होती.

2019 मध्ये रोहन प्रीत सिंग 'इंडियाज राइजिंग स्टार'च्या तिसर्‍या पर्वात स्पर्धक म्हणून झळकला होता. याशिवाय 'मुझे शादी करोगे' या वेडिंग रिअॅलिटी शोमध्ये देखील तो स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. 'बिग बॉस 13' ची स्पर्धक शहनाज गिलला केंद्रस्थानी ठेवून हा शो बनवण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...