आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PM रिपोर्टद्वारे KK च्या मृत्यूचे खरे कारण उजेडात:डॉक्टर म्हणाले -'एक्साइटमेंट'मुळे हार्ट झाले ब्लॉक, CPR मिळाला असता तर वाचले असते

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • केके यांच्या बाबतीत घडले सर्वात मोठी चूक.

बॉलिवूड गायक केके (कृष्ण कुमार कुन्नथ) यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले आहे. मंगळवारी कॉन्सर्टमध्ये अतिउत्साही झाल्यामुळे त्यांच्या हृदयात 80 टक्के ब्लॉकेज झाले होते, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना तातडीने सीपीआर दिला असता तर त्यांचा जीव वाचू शकला असता.

केके यांच्या बाबतीत घडलेली सर्वात मोठी चूक

केके यांना छातीत दुखत होते, पण अपचनाचा त्रास होतोय, असा विचार करुन त्यांनी अँटासिड औषधे घेतली. दरम्यान केके यांच्या पत्नीने कोलकाता पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगितले की, त्यांचे पती अनेकदा वेदना होत असताना अँटासिड्स घेत असायचे. कॉन्सर्टच्या सुमारास केके यांनी आपल्या पत्नीकडे खांदे आणि हात दुखत असल्याची तक्रार केली होती. याशिवाय त्यांच्या हॉटेलच्या खोलीतून अँटासिड औषधेही सापडली आहेत.

लाईव्ह शो दरम्यान रक्तप्रवाह थांबला

रक्तप्रवाह बंद झाल्याने केके यांच्या हृदयाचे ठोके अनियमित झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. काही वेळातच ते बेशुद्ध पडले आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
रक्तप्रवाह बंद झाल्याने केके यांच्या हृदयाचे ठोके अनियमित झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. काही वेळातच ते बेशुद्ध पडले आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

पोस्टमॉर्टममध्ये 3 मोठ्या गोष्टी उघड

1. वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना डॉक्टरांनी सांगितले की, केके यांच्या हृदयाच्या डाव्या बाजूला 80% ब्लॉकेज होते आणि इतर ठिकाणी लहान ब्लॉकेज होते.

2. लाईव्ह शोमध्ये केके फिरत-फिरत गर्दीसोबत नाचत होते. यामुळे ते अधिकच उत्साहित झाले, त्यामुळे त्यांच्या हृदयातील रक्तप्रवाह थांबला. हृदयविकाराच्या झटक्याचे हे कारण होते. कार्डिअॅक अरेस्टमध्ये व्यक्तीच्या हृदयाची धडधड लगेच थांबते.

3. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, रक्तप्रवाह थांबल्यामुळे गायकाच्या हृदयाचे ठोके अनियमित झाले. काही वेळातच केके बेशुद्ध पडले आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्याचवेळी त्यांना सीपीआर दिला असता तर आज ते जिवंत राहिले असते.

CPR म्हणजे काय?

CPR म्हणजेच कार्डिओ पल्मोनरी रिससिटॅशन ही आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला दिली जाणारी वैद्यकीय प्रक्रिया आहे. याद्वारे, हृदयविकाराचा झटका आणि श्वासोच्छवासाच्या स्थितीत एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवता येतात. या प्रक्रियेत, हृदयाचे ठोके परत आणण्यासाठी रुग्णाची छाती वारंवार दाबली जाते. याशिवाय, रुग्णाला तोंडावाटे श्वासोच्छ्वास दिला जातो.

सभागृहाच्या गलथान कारभारावरही प्रश्नचिन्ह
काही लोकांनी केके यांच्या मृत्यूसाठी आयोजकांच्या गलथान कारभाराला जबाबदार धरले आहे. केके कोलकाता येथील नजरुल मंचावर आपला परफॉर्मन्स देत होते. सोशल मीडिया पोस्टमध्ये एका प्रत्यक्षदर्शीने लिहिले - बंद सभागृहात खूप गर्दी होती आणि एसी काम करत नव्हता. केके यांनी एक दिवस आधीच एसीची तक्रार केली होती. हा मृत्यू सामान्य नव्हता.

प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यानुसार, ते खुले सभागृह नव्हते. इतके पैसे घेतले जात असताना आयोजकांनाही तयारीची काळजी घ्यायला हवी होती. कोलकात्याची ऊन, त्यावर सभागृह बंद, एवढ्या गर्दीत एसीही चालत नव्हता आणि एक व्यक्ती जीव ओतून त्याचे सादरीकरण करतोय, आणि अशातच त्याचा मृत्यू होतो, ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे. त्यांना आलेला हृदयविकाराचा झटका सामान्य नव्हता. (संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...)

केके पंचत्वात विलीन झाले
गुरुवारी 53 वर्षीय केके पंचत्त्वात विलीन झाले. त्यांचा मुलगा नकुल याने त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी संगीत क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटीही उपस्थित होते. केके यांनी मुलगी तमाराने वडिलांच्या फ्युनरल कार्डसोबत नोट शेअर केली आहे. तिने लिहिले 'लव्ह यू फॉरेव्हर डॅड'. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांनी साडेदहा ते साडेबारा ही वेळ ठेवली होती.

बातम्या आणखी आहेत...