आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनाक्षी सिन्हासोबत खास बातचीत:हुमा कुरेशाच्या घरी मिळाली 'डबल XL' चित्रपटाची ऑफर, भूमिकेसाठी वाढवले ​​15 किलो वजन

उमेशकुमार उपाध्याय23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनाक्षी सिन्हा, हुमा कुरेशी, झहीर इक्बाल स्टारर डबल एक्सेल हा चित्रपट 4 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. सतराम रमानी दिग्दर्शित या चित्रपटात क्रिकेटर शिखर धवनही दिसणार आहे. या चित्रपटासाठी हुमा आणि सोनाक्षी यांना आपले बरेच वजन वाढवावे लागले. सोनाक्षीने तिच्या भूमिकेसाठी तब्बल 15 किलो वजन वाढवले तर हुमा कुरेशीने 20 किलो वजन वाढवले ​​आहे. अलीकडेच सोनाक्षी सिन्हाने दिव्य मराठीसोबतच्या खास बातचीतमध्ये डबल एक्सेल चित्रपटात भूमिका साकारणे किती वेगळे होते, याचा उलगडा केला.

तुला हा चित्रपट कसा मिळाला?

सोनाक्षी म्हणाली- मला हा चित्रपट हुमाच्या घरी मिळाला आहे. खरंतर, लॉकडाऊन दरम्यान मी, झहीर इक्बाल आणि चित्रपटाचे लेखक मुदस्सर अजीज हुमाच्या घरी बसलो होतो. लॉकडाऊनमध्ये आपण किती पुट ऑन केले आहे, आता जिममध्ये जाऊन वजन कमी करावे लागेल, अशी आमची चर्चा सुरु होती. मुदस्सरला तिथेच कल्पना सुचली की, आपण अशाच एका विषयावर चित्रपट बनवला पाहिजे. जो दोन मुलींवर आधारित असले. आणि त्या दोन मुली फक्त तुम्ही दोघीच असू शकतात, असे त्याने आम्हाला म्हटले. दोन महिन्यांत त्याने स्क्रिप्ट तयार केली. त्यानंतर आम्ही चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात केली आणि आता हा चित्रपट 4 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.

तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल सांगा?

माझ्या पात्राचे नाव सायरा खन्ना आहे. ती दिल्ली शहरातील मुलगी आहे. तिला फॅशन डिझायनर व्हायचे आहे. मी फॅशन डिझायनिंगचा अभ्यास केल्यामुळे मला ही व्यक्तिरेखेची माझ्याजवळची वाटली. मी स्वतः फॅशन डिझायनिंग करताना एक ओव्हरसाइज मुलगी होते. सायरा ज्या अडचणीतून जात आहे त्या सर्व माझ्यासोबत घडल्या आहेत.

मोठे झाल्यानंतर बाह्य सौंदर्याला खूप महत्त्व दिले जाते. तुम्ही कसे कपडे घालता याबद्दल लोक तुम्हाला सतत विचारत असतात. ही कथा अशा दोन मुलींची आहे ज्यांना त्यांच्या आयुष्यात खूप भेदभावाला सामोरे जावे लागले. तरीही त्या पुढे जाऊन त्यांची स्वप्ने पूर्ण करतात.

ख-या जीवनात वाढलेल्या वजनावरुन तुला कोणत्या प्रकारच्या कमेंट्स ऐकायला मिळाल्या?

अशा अनेक प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. आपल्या समाजात असे बोलणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. मित्रांमध्ये अशा गोष्टी घडतात. लठ्ठपणासाठी एकमेकांची टिंगल उडवली जाते. पण त्या वयात तुम्ही मोठे होत असताना, ऑफकोर्स सगळ्यांनाच वाईट वाटते. मग ती स्त्री, पुरुष असो किंवा मुलगा-मुलगी असो. सगळ्यांचे मन दुखावले जाते. अशा अनेक गोष्टी ऐकायला मिळतात. मी शाळेत स्पोर्ट्स खेळायचे तेव्हा मुलं मला चिडवायची. माझ्या नावाने हाक मारायची. मला वाटतं, ही खूप सामान्य गोष्ट झाली आहे.

व्यक्तिरेखेसाठी तुला किती वजन वाढवावे लागले?

माझे वजन 15 किलो वाढले आहे. ते कमी करण्यासाठी जवळपास एक वर्ष लागले. इंडस्ट्रीत येण्यापूर्वीच मी 30 किलो वजन कमी केले होते. माझ्या शरीरावर काय सूट करतं हे आता मला कळले आहे. माझे वजन वाढले होते, पण ते मला ऍथलेटिक्सप्रमाणे कमी करायचे नव्हते. क्राइस डाएटिंग करुन किंवा शरीराला ताण देऊन मला ते कमी करायचे नव्हते. मी नशीबवान आहे की डबल एक्सेलनंतर माझा पुढचा प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी मला थोडा वेळ मिळाला, त्यामुळे वजन कमी करायला मला वेळ घेता आला. मला माझे मन मारून किंवा स्वतःवर दबाव टाकून स्लिम व्हायचे नव्हते. मी वेळ दिला आणि आनंदाने वजन कमी केले. वजन कमी करणे प्रत्येकासाठी आव्हानात्मक असते.

चित्रपटात तुझ्यासाठी सर्वात आव्हानात्मक काय होते?

कुश आणि मी पहिल्यांदाच एकमेकांसोबत काम करत आहोत. कधी कधी तो फरक कळत नाही की तुम्ही घरी आहात की सेटवर. ही गोष्ट अॅडजेस्ट करण्यासाठी तीन-चार दिवस लागले. पण तो फक्त माझा भाऊच नाही, तर दिग्दर्शकही आहे, हे माझ्या लक्षात आल्यानंतर सगळं सुरळीत चाललं. आम्ही चित्रपट खूप लवकर पूर्ण केला. कुश पहिल्यांदाच दिग्दर्शन करत आहे, पण तो शेड्यूलपूर्वीच त्याने पूर्ण केला.

बातम्या आणखी आहेत...