आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैफ अली खानच्या आगामी वेब सीरिजची एक्सक्लूझिव्ह माहिती:‘तांडव’मधील सैफचे पात्र राहुल गांधींशी मिळतेजुळते

अमित कर्ण7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 09 भागाची असेल ही वेब सिरीज
  • 15 जानेवारी 2021 मध्ये होणार रिलीज
  • 2016मध्ये झालेल्या प्रोटेस्टची झलक दिसणार, राजकीय हत्या, शेतकरी आंदोलन आदीही दिसेल.

‘सेक्रेड गेम्स’नंतर सैफ अली खानची आगामी सिरीज ‘तांडव’ लवकरच येणार अाहे. गुरुवारी त्याचे टीजर रिलीज झाले. यातील पात्राविषयी कोणी खुलासा केला नाही, मात्र ‘दिव्य मराठी’कडे यातील काही पात्राची माहिती हाती लागली आहे. सीरिजचे दिग्दर्शक अली अब्बास जफरसोबत काम करणाऱ्यांनी याविषयी मजेदार खुलासा केला आहे.

  • राजकारणावर आधारित या सीरिजमध्ये सैफ अली खानची भूमिका राहुल गांधी यांच्याशी मिळतीजुळती आहे, तर जिशान अय्युबचे पात्र यात विद्यार्थी नेते कन्हैयाकुमारवर आधारित आहे.
  • तिग्मांशू धुलिया सिरीजमध्ये सैफच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत, ते पंतप्रधान आहेत. ते ‘गँग्स ऑफ वासेपुर’नंतर पुन्हा एकदा राजकीय नेत्याच्या भूमिकेत आहेत.
  • निर्मात्यांनी यात शेतकरी आंदोलनाच्या आडून राजकीय पोळी भाजणाऱ्यांचाही एक भाग ठेवला आहे. सध्या योगायोगाने शेतकरी आंदोलनाची चर्चा आहे.
  • कुमुद मिश्राही महत्त्वाच्या भूमिकेत आहे तर डिंपल कपाडिया आणि तिग्मांशू धुलिया लग्न न झालेल्या जोडप्याच्या भूमिकेत आहेत.
  • तांडव’ची कथा नऊ भागांची आहे. यात फेब्रुवारीमध्ये 2016 मध्ये जेएनयूमध्ये झालेल्या प्रोटेस्टची ‍झलकही दाखवण्यात येईल. विद्यार्थी नेता बनलेल्या जिशान अय्युबच्या अटकेचाही एक भाग आहे.

मेक्सिकन शो ‘इनगोबरनेबल’सारखा थरार
अली अब्बास जफर यांनी पात्रांची माहिती उघड केली नाही, मात्र त्यांच्या जवळच्या लोकांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले, भारतीय वेब सिरीजच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झाले आहे, ज्यात भारतीय नेत्यांवर आधारित पात्र काल्पनिक कथेत घेतले जात आहेत. राजकीय कुटुंबातील षड्यंत्र ज्या प्रकारे मेक्सिकन शो ‘इंगोबर्नेबल’मध्ये दाखवण्यात आले होते तसाच थरार यातही पाहायला मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...