आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक्सक्लूझिव्ह:संजय दत्तने सोमवारी केले 'शमशेरा'चे चित्रीकरण; संजूचा आजार बघता सेटवर होती कडक सुरक्षा, प्रत्येकाची झाली कोरोना चाचणी

अमित कर्ण, मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजयचे पॅच वर्क शिल्लक होते. जे त्याने सोमवारी पूर्ण केले.

अभिनेता संजय दत्तने सोमवारी 'शमशेरा' या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. यशराज स्टुडिओच्या सूत्रांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. दरम्यान 'शमशेरा'च्या सेटवरुन संजयचा एक्सक्लूझिव्ह फोटो समोर आला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग आणि संजय दत्तचा आजार पाहता सेटवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

या चित्रपटात रणबीर कपूर याचीही महत्त्वाची भूमिका आहे. रणबीरचे चित्रीकरण यापूर्वीच पूर्ण झाले होते. तर संजयचे काही भागाचे चित्रीकरण व्हायचे होते. सोमवारी सेटवर पोहोचून संजयने आपल्या भागाचे चित्रीकरण पूर्ण केले.

या पोस्टद्वारे संजयने वैद्यकिय उपाचारांसाठी ब्रेक घेत असल्याचे सांगितले होते.

View this post on Instagram

🙏🏻

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay) on Aug 11, 2020 at 4:09am PDT

  • क्रूमधील प्रत्येक सदस्याची कोरोना टेस्ट झाली

संजूसाठी 'शमशेरा'च्या सेटवर विशेष व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोमवारी सेटवर फारच कमी लोक उपस्थित होते. तेथे हजर असलेल्या प्रत्येकाची कोरोना टेस्ट आधीच झाली आणि त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. सर्वांनी अतिशय सावधगिरीने शूट पूर्ण केले. दरम्यान, सोमवारी उशीरा रात्री पर्यंत थांबून संजयने दोन दिवसांचे चित्रीकरण एकाच दिवसात पूर्ण केले.

  • 8 ऑगस्टपासून ते ते आतापर्यंतचा प्रवास

8 ऑगस्ट रोजी संजय दत्तला श्वास घेण्यास त्रास झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांची पत्नी मान्यता आणि मुले दुबईमध्ये होती. 4 दिवसानंतर त्यांला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला, परंतु 11 ऑगस्ट रोजी संजयला फुफ्फुसांच्या कर्करोगाचे निदान झाले. त्यानंतर तो उपचारांसाठी परदेशात जाणार असल्याचा अंदाज वर्तवला गेला. परंतु सध्या संजय दत्त मुंबईतच डॉ. जलील पारकर यांच्याकडे उपचार घेत आहे. संजयला अमेरिकेचा पाच वर्षांचा व्हिसा मिळाला आहे. लवकरच तो आपल्या उर्वरित चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण करुन उपचारांसाठी अमेरिकेला रवाना होणार असल्याचे वृत्त आहे.