आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत आत्महत्या प्रकरण:सुशांतचा मृतदेह रुग्णवाहिकेतून नेणा-या ड्रायव्हरचा खुलासा - जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा मृतदेह पलंगावर होता, पोलिसांनीच मृतदेहाची छायाचित्रे सोशल मीडियावर टाकली होती

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतच्या मृत्यूनंतर ड्रायव्हर करीम त्याच्या सहका-यांसह सुशांतच्या घरी पोहोचला होता.
  • ड्रायव्हरने एका स्टिंगमध्ये कबुल केले की, पोलिसांनीच सुशांतच्या मृतदेहाची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली होती.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह त्याच्या घरुन रुग्णालयात घेऊन जाणा-या रुग्णवाहिकेचा चालक शाहनवाज अब्दुल करीमने दावा केला आहे की, त्याला आंतरराष्ट्रीय क्रमांकावरुन या प्रकरणी तोंड बंद ठेवण्यासाठी धमकीचे कॉल येत आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर करीम आपल्या सहका-यांसह सुशांतच्या घरी पोहोचला होता आणि त्याचे पार्थिव कूपर रुग्णालयात नेले होते.

शाहनवाजने एका इंग्रजी वाहिनीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये दावा केला आहे की, जेव्हा तो वांद्रेच्या फ्लॅटमध्ये पोहोचला तेव्हा सुशांतचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत नव्हता तर त्याला खाली उतरवण्यात आले होते आणि त्याच्या टीमनेच त्याचे पार्थिव पांढ-या कपड्यात गुंडाळले आणि ते रुग्णवाहिकेत नेले होते.

पोलिसांनीच सुशांतच्या पार्थिवाची छायाचित्रे सोशल मीडियावर टाकली

याशिवाय सुशांतच्या पार्थिवाची छायाचित्रे सोशल मीडियावर मुंबई पोलिसांच्या लोकांनी अपलोड केल्याचा धक्कादायक दावा शाहनवाजने केला आहे. तो म्हणाला की, आधी पोलिसांनी त्यांना नानावटी हॉस्पिटलमध्ये जायचे आहे असे सांगितले होते, पण नंतर मृतदेह कूपर रुग्णालयात हलवण्यास सांगितला.

रुग्णवाहिका बदलण्याचे हे होते कारण

सुशांतच्या घरी दोन रुग्णवाहिका पाठवल्याबद्दल रुग्णवाहिकेचा मालक राहुलने सांगितले की, सुशांतने आत्महत्या केली त्या दिवशी तो गावात होता, म्हणून त्याचा भाऊ अक्षय रुग्णवाहिका घेऊन सुशांतच्या घरी गेला होता. अक्षय सुशांतच्या घरी पोहोचला तेव्हा त्याचा मृतदेह आधीच खाली उतरवण्यात आला होता. त्यानंतर रुग्णवाहिका कर्मचा्यांनी त्याचे पार्थिव स्ट्रेचरवरुन घराबाहेर आणले. परंतु रुग्णवाहिकेच्या व्हीलचेयरमध्ये काही अडचण आल्यामुळे सुशांतचा मृतदेह त्या रुग्णवाहिकेत बसत नव्हता, म्हणून राहुलने आपली दुसरी रुग्णवाहिका बोलवली आणि मग तेथून ते रवाना झाले होते.

बातम्या आणखी आहेत...