आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रग्ज प्रकरणात अडकलेली ग्रॅब्रिएला डेमेट्रियड्स कोण आहे?:वयाच्या 16 व्या वर्षीपासून मॉडेलिंग करत आहे अर्जुन रामपालची लिव्ह इन पार्टनर ग्रॅबिएला, लग्नाविनाच झाली आहे आई

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गॅब्रिएला आणि अर्जुन यांनी अद्याप लग्न केलेले नाही.

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड ग्रॅब्रिएला डेमेट्रियड्स हे नाव ड्रग्ज प्रकरणार समोर आल्यापासून चर्चेत आहे. एनसीबीने मागील महिन्यात ग्रॅबिएलाचा भाऊ अगिसिलाओस याला अटक केली होती. त्याच्याजवळ चरस आणि अल्प्राजोलम टॅबलेट एनसबीने जप्त केल्या होत्या. 15 डिसेंबर रोजी अगिसिलाओसला जामीन मंजुर झाला आहे.

याशिवाय अर्जुन रामपालच्या घरी छापेमारी दरम्यान काही बंदी घातलेली औषधे सापडली, त्यानंतर अर्जुन आणि गॅब्रिएला यांना एनसीबीने चौकशीसाठी अनेक वेळा त्यांच्या कार्यालयात बोलावले होते. ड्रग्ज प्रकरणात नाव समोर आल्यानंतर अर्जुन आणि गॅब्रिएला यांच्यावर टीका होतेय. एक नजर टाकुया ग्रॅबिएलाच्या आयुष्याशी निगडीत काही खास गोष्टींवर...

वयाच्या 16 व्या वर्षी मॉडेलिंगला केली सुरुवात

  • गॅब्रिएलाचा जन्म 7 एप्रिल 1987 रोजी दक्षिण आफ्रिकेच्या पोर्ट एलिझाबेथ येथे झाला. ती 33 वर्षांची आहे. तिची आई एक कलाकार होती आणि आजी फॅब्रिक स्टोअर चालवत होती. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन गॅब्रिएलाने फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. याचदरम्यान तिचा मॉडेलिंगकडे कल वाढला आणि तिने वयाच्या 16 व्या वर्षीपासून मॉडेलिंगला सुरुवात केली.
  • गॅब्रिएला मॉडेलिंगच्या असाइनमेंटच्या शोधत भारतात आली आणि इथल्या अनेक कंपन्यांच्या जाहिरातींमध्ये काम केले. 2009 मध्ये इंडियन प्रीमियर लीग बॉलिवूड जिंकून ती प्रकाशझोतात आली. 2012 मध्ये ती एफएचएम मासिकाची कव्हर गर्ल झाली होती.
  • 'रेड वाईन' या मल्याळम चित्रपटाच्या प्रोमो गाण्यात गॅब्रिएला झळकली होती. याशिवाय ती गायक आदित्य नारायणच्या 'तू ही प्यार है' या गाण्याच्या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. गॅब्रिएलाने बॉलिवूड फिल्म 'सोनाली केबल' आणि तेलगू-तामिळ फिल्म 'ओपिरी'मध्ये देखील काम केले आहे.

घटस्फोटित अर्जुनसोबत लिव्ह इनमध्ये राहते

  • गॅब्रिएला तिचे कपड्याचे लेबल 'DEME' चालवते. याशिवाय ती व्हीआरटीटी व्हिंटेज नावाच्या प्लॅटफॉर्मची सह-मालक आहे, जे वापरलेल्या लक्झरी वस्तूंची खरेदी आणि विक्री करतो.
  • 23 एप्रिल 2019 रोजी बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालने सोशल मीडियावर ग्रॅबिएलासोबतच्या आपल्या नात्याचा खुलासा केला होता. त्यावेळी ग्रॅबिएला आपल्या मुलाची आई होणार असल्याचे अर्जुनने सांगितले होते. गॅब्रिएला आणि अर्जुन जवळजवळ दोन वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहेत.
  • गॅब्रिएला आणि अर्जुन यांनी अद्याप लग्न केलेले नाही. मात्र यावर्षी जुलै 2020 मध्ये त्यांचा मुलगा एरिकचा जन्म झाला. गॅब्रिएलापूर्वी अर्जुनचे मॉडेल मेहर जेसियासोबत लग्न झाले होते. लग्नाच्या 21 वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला. पहिल्या लग्नापासून अर्जुनला दोन मुली आहेत.
बातम्या आणखी आहेत...