आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज कुंद्रा वादात:लंडनमध्ये बस कंडक्टर म्हणून काम करायचे वडील, राज कुंद्रा विकायचा पश्मिना शाल, नंतर हिरा व्यापारी झाला आणि उभे केली 2800 कोटींचे साम्राज्य!

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोण आहे राज कुंद्रा?

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा सध्या चर्चेत आहेत. सोमवारी उशिरा रात्री राज कुंद्राला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अ‍ॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याच प्रकरणात राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

तसे पाहता, राज कुंद्रा वादात अडकल्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी तो आयपीएलच्या सट्टेबाजीत दोषी आढळला होता. राजस्थान रॉयल्सचा सह-मालक असलेल्या राज कुंद्राने काही वर्षांपूर्वी आयपीएल सामन्यादरम्यान सट्टेबाजी केल्याची कबुली दिली होती.

राज कुंद्रा देशातील प्रसिद्ध नाव आहे. भारतात लोक त्याला बिझनेसमनहून अधिक अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा म्हणून अधिक ओळखतात. एका मुलाखतीत राज कुंद्राने म्हटले होते की, 'आज मी सुखी आणि आरामदायक आयुष्य जगत आहे. मात्र माझे बालपण अगदी याउलट होते.'

वयाच्या 18व्या वर्षी सुरु केला स्वतःचा व्यवसाय...
एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या राज कुंद्राचे बालपण हलाखीच्या परिस्थितीत गेले. राज कुंद्राचे वडील कृष्ण कुंद्रा हे लुधियानामधून लंडनमध्ये स्थायिक झाल्यानंतर लंडनमध्ये राजचा जन्म झाला. कृष्ण कुंद्रा हे लंडनमध्ये बस कंडक्टर म्हणून काम करायचे. तर आई राणी कुंद्रा शॉप असिस्टंट म्हणून नोकरी करायच्या. नंतर राजच्या वडिलांनी एक रेस्तराँ सुरु केले. राज कुंद्राने वयाच्या 18व्या वर्षीच शिक्षण सोडले होते. वयाची 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर त्याला त्याच्या वडिलांनी म्हटले की, एकतर आमचे रेस्तराँ चालव, किंवा स्वतःचे काम सुरु कर. आईवडिलांचे म्हणणे त्याने गांभीर्याने घेतले आणि कामाला सुरुवात केली.

राजने 2009 मध्ये शिल्पाशी लग्न केले होते.
राजने 2009 मध्ये शिल्पाशी लग्न केले होते.

शॉल विकून सुरु केला होता बिझनेस

काही पैसे घेऊन राज दुबईत गेला. हि-यांच्या व्यापा-यांची भेट घेतली. मात्र तेथे त्याला काम मिळाले नाही. तेथून राज नेपाळला गेला. तेथे पश्मिना शॉल खरेदी केल्या आणि ब्रिटेनमधील काही ब्रॅण्डेड स्टोअरच्या मदतीने त्याची विक्री सुरु केली. अल्पावधीतच त्यांचा बिझनेस वाढू लागला. हा व्यवसाय सुरळीत सुरु झाल्यानंतर राज हि-यांचा व्यापार करण्यासाठी पुन्हा दुबईत गेला. तेव्हापासून त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. आज वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांच्या 10 कंपन्या आहेत. 2004 मध्ये एका ब्रिटीश मॅगझिनने त्याला सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत 198 वे स्थान दिले होते. राजने 2020 मध्ये मुंबईत एक रेस्तराँ उघडले आहे. याआधीही त्याच्याकडे मुंबईत एक रेस्तराँ आहे, जे बरेच प्रसिद्ध आहे. इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार त्याच्याकडे 2800 कोटींची संपत्ती आहे.

पुर्वाश्रमीची पत्नी कविता आणि दुसरी पत्नी शिल्पासह राज कुंद्रा.
पुर्वाश्रमीची पत्नी कविता आणि दुसरी पत्नी शिल्पासह राज कुंद्रा.

दुसरी पत्नी आहे शिल्पा

राजने दोनदा लग्न केले. त्याचे पहिले लग्न कविता कुंद्राशी झाले होते. काही वर्षानंतर दोघेही वेगळे झाले. यानंतर राजने 22 नोव्हेंबर 2009 रोजी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीशी लग्न केले. त्यांना मुलगा विवान आणि मुलगी समिशा अशी दोन मुले आहेत.

बातम्या आणखी आहेत...