आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी आहे सुझानची कहाणी:सुझानला ट्रॅफिक सिग्नलवर पाहिल्यानंतर तिच्या प्रेमात पडला होता हृतिक रोशन, 17 वर्षे टिकला संसार, पोटगी म्हणून मिळाले होते 380 कोटी रुपये!

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्या सुझानचे नाव चर्चेत आहे.

मुंबई पोलिसांनी मंगळवारी भल्या पहाटे एका पॉश क्लबवर छापा मारून फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे उल्लंघन केल्याने 34 जणांना अटक केली. यात क्रिकेटपटू सुरेश रैना, अभिनेता हृतिक रोशनची माजी पत्नी सुझान खान, गायक गुरू रंधावासह अनेक सेलिब्रेटींचा समावेश आहे. कोरोनामुळे नवीन प्रतिबंध आणि राज्यात सोमवारी रात्रीपासून लागू रात्रीच्या संचारबंदीनंतरही मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच्या ड्रॅगनफ्लाय एक्स्पीरियन्स क्लबमध्ये पार्टी सुरू होती. गोपनीय माहितीच्या आधारे पहाटे 3 वाजता नाइट क्लबवर छापा टाकला. यात 34 जणांवर कारवाई करण्यात आली. 27 सेलिब्रिटी आणि 7 स्टाफविरोधात भादवी कलम 188, 269 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. वृत्तानुसार, सेलिब्रिटींना अटक केल्यानंतर सोडण्यात आले होते.

या कारवाईबाबत सुझान खानने सोशल मीडियावर स्पष्टीकरण देऊन अटकेचे वृत्त साफ खोटे आणि बेजबाबदार असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर सुझान चर्चेत आली आहे. चला जाऊन घेऊयात तिच्याबद्दलचे काही फॅक्ट्स...

इंटिरियर डिझायनर आहे सुझान

सुझान एक यशस्वी इंटिरियर आणि फॅशन डिझायनर आहे. तिचा जन्म 26 ऑक्टोबर 1978 रोजी मुंबई येथे झाला होता. बॉलिवूड अभिनेता संजय खान आणि झरीन हे तिचे आईवडील आहेत. सुझानला दोन मोठ्या बहिणी आहेत - सिमोन आणि फराह ही त्यांची नावे आहेत. तर अभिनेता जाएद खान तिचा धाकटा भाऊ आहे.

1995 मध्ये अमेरिकेच्या ब्रूक्स कॉलेजमधून सुझानने इंटिरियर डिझायनिंगची पदवी घेतली. 2011 मध्ये तिने शाहरुख खानची पत्नी गौरीबरोबर काम करण्यास सुरुवात केली आणि मुंबईतील चारकोल प्रोजेक्ट फाउंडेशनची स्थापना केली, हे भारतातील पहिले इंटिरियर फॅशन डिझाईन स्टोअर आहे.

हृतिक रोशन सोबत झाले होते लग्न
सुझान ही हृतिक रोशनची पुर्वाश्रमीची पत्नी आहे. चार वर्षांच्या डेटिंगनंतर दोघांनी 2000 मध्ये लग्न केले होते. हृतिकने ट्रॅफिक सिग्नलवर सुझानला पाहिले आणि तिच्या प्रेमात पडला होता. त्यानंतर व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्याने सुझानला गुडघ्यावर बसून प्रपोज केले होते. बरेच दिवस रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी 20 डिसेंबर 2000 रोजी लग्न केले होते. लग्नाच्या 6 वर्षानंतर 2006 मध्ये हृहानचा तर 2008 मध्ये हृदानचा जन्म झाला.

हृतिक-सुझानचा घटस्फोट
हृतिक आणि सुझान लग्नात कधी दरी पडली कुणालाच कळाले नाही. 13 डिसेंबर 2013मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. दोघांनी आपलेय 17 वर्षे जूने नाते संपुष्टात आणले. एका पत्रकार परिषदेत हृतिकने सांगितले होते, 'सुझानने माझ्यापासून विभक्त होण्याचा आणि 17 वर्षे जूने नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या कुटुंबीयांसाठी हा काळ खूप वाईट आहे. मी माध्यमांना विनंती करतो, की आमच्या खासगी आयुष्याला खासगी ठेवा.'

मीडिया रिपोर्टनुसार, हृतिकने घटस्फोटाच्या बदल्यात सुझानला पोटगी म्हणून 380 कोटी रुपये दिले होते. मात्र हृतिक-सुझानने या वृत्ताचे खंडन केले होते. परंतु या दोघांचा घटस्फोट हा देशातील सर्वात महागडा घटस्फोट असल्याचे म्हटले जाते.

बातम्या आणखी आहेत...