आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिशा मृत्यू प्रकरणाचा तपास आता CBI च्या हातात:ज्याच्याशी होणार होते सुशांतची माजी मॅनेजर दिशा सालियानचे लग्न, त्याच्याच घरात 8 जून रोजी आढळली होती मृतावस्थेत

मुंबई3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
दिशाचा होणारा नवरा रोहन हा अभिनेता आहे. बॉम्बर्स या वेब सीरिजमध्ये तो झळकला होता.
 • 8 जून रोजी, 28 वर्षीय दिशा मुंबईमध्ये रहस्यमय परिस्थितीत मृतावस्थेत आढळली होती.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतनंतर आता त्याची माजी मॅनेजर दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. 3 सप्टेंबर रोजी बंटी सजदेहला सीबीआयने मुंबई डीआरडीओ गेस्टहाऊस येथे बोलावले असून तेथे त्याची चौकशी होत आहे.

8 जून रोजी, 28 वर्षीय दिशा मुंबईमध्ये रहस्यमय परिस्थितीत मृतावस्थेत आढळली होती.
8 जून रोजी, 28 वर्षीय दिशा मुंबईमध्ये रहस्यमय परिस्थितीत मृतावस्थेत आढळली होती.

मृत्यूपूर्वी दिशा बंटीची टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी कॉर्नर-स्टोन येथे काम करत होती. 8 जून रोजी, 28 वर्षीय दिशा मुंबईमध्ये रहस्यमय परिस्थितीत मृतावस्थेत आढळली होती. त्यानंतर आठवड्याभराने म्हणजे 14 जून रोजी सुशांतच्या मृत्यूच्या बातमीने खळबळ उडाली होती.

अशा परिस्थितीत या दोन मृत्यू प्रकरणात काही संबंध आहे की नाही याची चौकशी सीबीआय करत आहे. जाणून घेऊयात, दिशाशी संबंधित काही फॅक्टस...

 • दिशा पेशाने सेलिब्रिटी मॅनेजर होती.
 • तिचा जन्म 26 मे 1992 रोजी कर्नाटकच्या उडुपी येथे झाला होता.
 • दिशाला मुंबईतील दादर पारसी युवा असेंबली हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले होते.
 • मुंबईच्या आर. डी. नॅशनल कॉलेज आणि डब्ल्यू. ए.सायन्स कॉलेजमधून मास मीडियामध्ये तिने ग्रॅजुएशन केले होते.
 • पदवी संपादन केल्यानंतर दिशाने विंकबॉल कंपनीमध्ये फ्रिलान्स रिपोर्टर म्हणून काम करण्यास सुरवात केली होती. यानंतर तिने एका मीडिया हाऊसमध्ये रिसर्चर म्हणून काम केले होते.
वरुण शर्मासोबत दिशा
वरुण शर्मासोबत दिशा
 • त्यानंतर दिशाने मीडिया वांटेज, इमेजस्मिथ्स, सीएए कोव्हन टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीमध्ये टॅलेंट मॅनेजर म्हणून काम केले.
 • मृत्यू होण्यापूर्वी ती कॉर्नर-स्टोन कंपनीत सेलिब्रिटी मॅनेजर म्हणून काम करत होती.
 • भारती सिंग, वरुण शर्मा, रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूत हे दिशाचे क्लायंट होते.
होणा-या नव-यासोबत दिशा
होणा-या नव-यासोबत दिशा
 • दिशाच्या खासगी आयुष्याविषयी सांगायचे म्हणजे तिचा टीव्ही अभिनेता रोहन रॉयसोबत साखरपुडा झाला होता.
 • कोरोना लॉकडाऊन दरम्यान, दिशा तिच्या भावी नव-याच्या घरी शिफ्ट झाली होती. येथेच 8 जून रोजी तो मृतावस्थेत आढळली होती.
 • दिशा 2020 च्या अखेरीस लग्न करणार होती. तिचे वडील सतीश सालियन यांनी सांगितले होते की, ती लग्नाबद्दल खूप उत्सुक होती. दिशाच्या लग्नाचे रिसेप्शन डिसेंबर 2020 किंवा जानेवारी 2021 मध्ये नियोजित होते. दिशा-रोहन कोर्ट मॅरेज करायचे होते.

संशयास्पद आहे दिशाचा मृत्यू

दिशाच्या मृत्यूचे कोडे अद्याप सुटलेले नाही. सुरुवातीला असे म्हटले जात होते की, तिने तिच्या भावी नव-याच्या 14 व्या मजल्यावरील घरातून उडी मारून आत्महत्या केली. मृत्यूच्या काही वेळापूर्वी तिचे आणि रोहनचे भांडण झाल्याचे म्हटले जात आहे.

दिशा नशेत होती, तिचा तोल गेला आणि ती खाली पडली, असे म्हटले गेले होते. पण आता दिशाच्या मृत्यूविषयी काही वेगळ्या बातम्या समोर येत आहेत. इतकेच नाही तर तिची हत्या करण्यात आल्याची शंका उपस्थित केली जात आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, दिशा सूरज पांचोलीच्या बाळाची आई होणार होती, म्हणून तिची हत्या करण्यात आली. मात्र सूरजने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दिशाला कधीच भेटलो नव्हतो, ती कशी दिसायची हे देखील माहित नाही, असे सूरज म्हणाला आहे.