आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशी सुरु आहे. सीबीआयने सर्वप्रथम ज्या व्यक्तींना चौकशीसाठी बोलावले त्यापैकी एक सिद्धार्थ पिठानी एक आहे. सीबीआयच्या टीमकडून सलग तिस-या दिवशी सिद्धार्थची चौकशी सुरु आहे. कारण सुशांतचा मृतदेह पंख्यावरुन सिद्धार्थनेच खाली काढला होता.
14 जून रोजी सुशांतचा मृतदेह त्याच्या बेडरुममधील पंख्यावर लटकलेल्या अवस्थेत आढळल्याचा सिद्धार्थचा दावा आहे. सिद्धार्थ सुशांतचा फ्लॅटमेट होता. एप्रिल 2019 ते जून 2020 पर्यंत तो सुशांतच्या अपार्टमेंटमध्ये त्याच्याबरोबर होता.
सुशांतचा मृत्यू झाल्यापासून सिद्धार्थ कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आला आहे. सुशांतच्या मृत्यूविषयीची बरीच माहिती लपवल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. तसेच सुशांतच्या कुटुंबीयांचाही सिद्धार्थवर आरोप आहे की, या प्रकरणात तो रिया चक्रवर्तीला पाठिंबा देत आहे. तो आधी रियाविरूद्ध बर्याच गोष्टी सांगत होता पण नंतर त्याने आपली बाजू बदलली.
सिद्धार्थने सुशांतच्या कुटुंबीयांवर रियाविरुद्ध साक्ष देण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप केला आहे. आता सिद्धार्थच्या बोलण्यात किती तथ्य आहे, सुशांतच्या मृत्यूसंदर्भात तो कोणता खुलासा करतो, हे सीबीआय चौकशीत समोर येईल. एक नजर टाकुया कोण आहे सिद्धार्थ पिठानी...
27 मार्च 1993 रोजी जन्मलेला सिद्धार्थ 27 वर्षांचा आहे. हैदराबादमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात तो लहानाचा मोठा झाला. त्याने आपले प्रारंभिक शिक्षण हैदराबादमधील श्री चैतन्य ज्युनियर कालासला येथून केले. त्यानंतर अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनमध्ये प्रवेश घेतला, जिथे त्याने डिझायनिंगची पदवी पूर्ण केली.
सिद्धार्थला लहानपणापासूनच चित्रपट निर्मिती आणि अभिनयात रस होता. चित्रपटसृष्टीत अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून ओळख निर्माण व्हावी अशी त्याची इच्छा आहे. यामुळेच ग्रॅज्युएशननंतर तो मुंबईला आला.
रियासोबत आहे मैत्री
सिद्धार्थला सुशांतने कामावर ठेवले असले तरी त्याची रिया चक्रवर्तीशी खूप घनिष्ठ मैत्री आहे. याचा पुरावा रियाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून मिळतो. लॉकडाऊन दरम्यान, जेव्हा रिया सुशांतसोबत त्याच्या घरी राहात होती, तेव्हा तिने सिद्धार्थला तिचा क्वारंटाइन पार्टनर म्हटले होते.
याकाळात रियाने इंस्टाग्रामवर शेअर केलेले सर्व व्हिडिओ सिद्धार्थ पिठानीने शूट केले होते. मात्र, पोलिस तपासणी दरम्यान सिद्धार्थने सांगितले होते की, तो रिया आणि सुशांतच्या वैयक्तिक गोष्टीत कधीच हस्तक्षेप करत नव्हता आणि सुशांतच्या मृत्यूबद्दल त्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितले होते.
View this post on InstagramA post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty) on Jun 2, 2020 at 3:21am PDT
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.