आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांतचे कुटुंब:सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्ती पुर्वी करायची मॉडेलिंग; आता आहे बिझनेसवुमन, कॅलिफोर्नियामध्ये चालवते शाळा

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या, सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्ती हिच्याविषयी...

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्यांचे कुटुंब त्याच्यासाठी न्यायाची मागणी करत आहे. कुटुंबाच्या वतीने सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्ती ही सोशल मीडियाच्या माध्यमातून सुशांतच्या चाहत्यांच्या संपर्कात आहे. श्वेता ही सुशांतची धाकटी बहीण आहे. तिने सुशांत मृत्यू प्रकरणात सीबीआय चौकशीसाठी सोशल मीडियावर मोहीम राबवली.

श्वेताच्या प्रयत्नांना यश आले आणि अखेर हे प्रकरण मुंबई पोलिस, बिहार पोलिसांनंतर सीबीआयकडे सोपविण्यात आले. हा खटला सीबीआयकडे गेल्यानंतर श्वेताने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. प्रत्यक्षात हे पहिले पाऊल आहे आणि आपल्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी तिला अजून मोठा लढा द्यावा लागणार आहे.

जाणून घेऊयात श्वेताविषयी...

मलडीहा गावात जन्म
श्वेताचा जन्म 10 नोव्हेंबर 1987 रोजी बिहारच्या मलडीहा गावात झाला. तिच्या वडिलांचे नाव कृष्णकांत सिंह आणि आईचे नाव उषा सिंह आहे. वडील एक सरकारी कर्मचारी होते आणि आई गृहिणी होती. आईचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. सुशांत श्वेताचा एकुलता एक भाऊ होता. तिला तीन मोठ्या बहिणी आहेत. राणी, प्रियंका आणि मितू ही त्यांची नावे आहेत. श्वेताने आपले प्रारंभिक शिक्षण
पाटण्यातील सेंट करेन हायस्कूलमधून केले.

बहिणी मीतू, प्रियंका, राणी, वडील केके सिंह आणि भाऊ सुशांतसह श्वेता
बहिणी मीतू, प्रियंका, राणी, वडील केके सिंह आणि भाऊ सुशांतसह श्वेता
  • फॅशन आणि मॉडेलिंगमध्ये करिअर केले

श्वेताला बालपणापासूनचे मॉडेलिंग आणि फॅशनचे आकर्षण होते. यामुळेच तिने चेन्नईच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशनमध्ये प्रवेश घेतला आणि त्यानंतर फॅशन डिझायनिंगमध्ये पदवी मिळवण्यासाठी द आर्ट इन्स्टिट्यूट ऑफ कॅलिफोर्निया-सॅन फ्रान्सिस्को येथे गेली.

त्यानंतर तिने कॅलिफोर्नियाच्या आर्ट इन्स्टिट्यूटमधून फॅशन आणि डिझायनिंगचा आणखी एक कोर्स केला. यानंतर, तिने कॅलिफोर्नियातील सेन जोस स्टेट युनिव्हर्सिटीमधून मास्टर्स ऑफ बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण पूर्ण केले. पदवी पूर्ण केल्यावर श्वेताने सुप्रसिद्ध ब्रँड लॉरियलमध्ये ब्युटी कन्सल्टंट म्हणून काम करण्यास सुरवात केली.

पुढे ती सेलिब्रिटी फॅशन लिमिटेड कंपनीत डिझायनर आणि कॉर्पोरेट प्रेझेंटर म्हणून रुजू झाली. या व्यतिरिक्त श्वेताने फ्रीलान्स मॉडेल म्हणूनही काम केले आहे. सध्या श्वेता स्वतः एक बिझिनेस वूमन झाली आहे. कॅलिफोर्नियाच्या लिवरमोरमध्ये तिने मुलांसाठी 'दमारा किड्स' नावाची नर्सरी शाळा देखील उघडली आहे.

  • श्वेता अमेरिकेत सेटल आहे

20 जून 2007 रोजी बिहारमधील पाटणा येथे विशाल किर्तीशी श्वेताचे लग्न झाले. दोघे बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते. नंतर त्यांनी लग्न थाटले.

श्वेताच्या लग्नाचा फोटो. यात सुशांत दिसतोय.
श्वेताच्या लग्नाचा फोटो. यात सुशांत दिसतोय.

विशाल हा कॅलिफोर्नियातील एक बिझनेसमन आहे. बर्‍याच काळापासून तिथे सेटल आहे. या जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

श्वेताचे कुटुंब
श्वेताचे कुटुंब

32 वर्षीय श्वेताने बिझनेस वुमन होण्यापूर्वी 'बर्कले प्लेहाउस' आणि 'पवित्र हलकाट्टी' सारख्या अनेक संस्थांमध्ये काम केले.