आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Failed Relation: Popstar Shakira And PK Gerard's Relationship Broke After 12 Years Due To Cheating, These Celebs Also Got Cheated In Love

लव, रिलेशन आणि धोका:प्रेमात दगा दिल्याने शकीराने 12 वर्षांनंतर तोडले पीके जेरार्डसोबतचे नाते, या सेलेब्सचीही प्रेमात झाली फसवणुक

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घेऊया या सेलेब्सविषयी -

पॉपस्टार शकीरा 12 वर्षांनंतर तिचा प्रियकर पीके जेरार्डपासून विभक्त झाली आहे. दोघांनाही दोन मुले आहेत. पीकेचे विवाहबाह्य संबंध हे नाते संपुष्टात येण्याचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. शकीरा व्यतिरिक्त असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांची त्यांच्या जोडीदाराने फसवणूक केली होती -

सना खान

धर्मासाठी बॉलिवूड इंडस्ट्री सोडलेल्या सना खानने तिचा एक्स बॉयफ्रेंड मेल्विन लुईसवर फसवणुकीचा आरोपही केला होता. ब्रेकअपनंतर सनाने लाइव्ह व्हिडिओद्वारे सांगितले होते की, तिने लुईसला इतर मुलींसोबत अनेकदा रंगेहाथ पकडले, त्यामुळे दोघांमध्ये खूप भांडण झाले होते.

रवीना टंडन

रवीना टंडन एकेकाळी खिलाडी अक्षय कुमारसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघांचा साखरपुडा झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. रवीनासोबत रिलेशनशिपमध्ये असताना अक्षयने शिल्पा शेट्टीशी जवळीक वाढवली होती. ब्रेकअपनंतर अक्षयने आपली फसवणूक केल्याचा खुलासा रविनाने केला होता.

शिल्पा शेट्टी

रवीनाला सोडून शिल्पाचा हात धरणाऱ्या अक्षय कुमारवर एकदा नव्हे तर दोनदा फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. पहिले रवीना आणि नंतर शिल्पाने त्याच्यावर हे आरोप केले होते. अक्षय शिल्पासोबत रिलेशनशिपमध्ये होता पण त्याने अचानक ट्विंकल खन्नासोबत लग्न केले. ब्रेकअपच्या वेळी अक्षय आणि शिल्पा हे दोघेही 'धडकन' या चित्रपटात एकत्र काम करत होते. त्यानंतर शिल्पाने अक्षयसोबत पुन्हा कधीही काम करणार नसल्याचे सांगितले होते.

सुनीता आहुजा​​​​​​​

गोविंदावर फसवणुकीचा आरोप आहे. एकेकाळी विवाहित गोविंदाची राणी मुखर्जीसोबतची जवळीक वाढली होती. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या आल्या होत्या. ही बातमी गोविंदाच्या घरी पोहोचताच त्याची पत्नी सुनीता चांगलीच संतापली होती. प्रकरण इतके वाढले की, गोविंदाला राणीपासून दूर व्हावे लागले होते.

दीपिका पदुकोण​​​​​​​​​​​​​​

अभिनेत्री दीपिका पदुकोण एकेकाळी अभिनेता रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. बचना ए हसीनो या चित्रपटात काम करताना दोघे प्रेमात पडले होते. दीपिका रणबीरसाठी इतकी गंभीर होती की, तिने तिच्या मानेवर आरके अक्षरांचा टॅटूही काढला होता. राजनीती आणि अजब प्रेम की गजब कहानी या चित्रपटांमध्ये एकत्र काम करताना रणबीर आणि कतरिना यांच्यात जवळीक वाढली. दीपिकाला याची माहिती मिळताच तिने रणबीरसोबत ब्रेकअप केले. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान दीपिकाने रणबीरला चीटर म्हटले होते.

अमृता सिंग

सैफ अली खानने 1991 मध्ये स्वतःपेक्षा मोठ्या वयाच्या अमृता सिंगशी लग्न केले होते. या लग्नापासून या जोडप्याला सारा आणि इब्राहिम ही दोन मुले आहेत. सैफची इटालियन मॉडेल रोजा कॅटलानोसोबत जवळीक वाढल्याने त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी निर्माण झाल्या. दोघांमधील भांडणे वाढू लागली आणि 2004 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

जरीना वहाब​​​​​​​​​​​​​​

जरीना वहाबचा पती आदित्य पांचोलीचे नाव अभिनेत्री कंगना रनोटशी जोडले गेले आहे. कंगना आणि आदित्य रिलेशनशिपमध्ये होते. दोघांचे नातेही बराच काळ चर्चेत होते.

सायरा बानो​​​​​​​​​​​​​​

दिलीप कुमार यांनी सायरा बानो यांच्याशी 1972 मध्ये लग्न केले होते. लग्नाच्या काही वर्षानंतर दिलीप यांनी 1981 मध्ये आसमा रहमानशी गुपचूप लग्न केले. आपल्या आत्मचरित्रात याचा खुलासा करताना दिलीप यांनी ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचे म्हटले होते.

नीलम कोठारी​​​​​​​​​​​​​​

गोविंदा एकेकाळी त्याच्या डेब्यू चित्रपटातील को-स्टार नीलम कोठारीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. नीलम आणि गोविंदा यांनी 14 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते, त्यादरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दरम्यान, गोविंदाच्या आईने त्याचे बालपणीची मैत्रीण सुनीता हिच्याशी लग्न लावून दिले. आपल्या करिअरच्या सुरुवातीला गोविंदाने आपले लग्न गुपित ठेवले होते आणि नीलमलाही याची माहिती नव्हती. जेव्हा तिला गोविंदाच्या लग्नाची माहिती मिळाली तेव्हा तिने हे नाते संपुष्टात आणले होते.

बातम्या आणखी आहेत...