आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिरच्या घटस्फोटावर भावाची प्रतिक्रिया:आमिर आणि किरण राव यांच्या घटस्फोटावर भाऊ फैजल खान म्हणाला  - 'माझे स्वतःचे लग्न यशस्वी झाले नाही त्यामुळे मला कुणाबद्दलही बोलण्याचा हक्क नाही'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 3 सप्टेंबर रोजी फैजलचा ‘फॅक्टरी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा भाऊ फैजल खान दीर्घ काळानंतर चित्रपटसृष्टीत कमबॅक करत आहे. फैजल खान लवकरच ‘फॅक्टरी’ या चित्रपटात झळकणार आहे. 3 सप्टेंबर रोजी फैजलचा ‘फॅक्टरी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून ट्रेलरमधील फैजलच्या भूमिकेन अनेकांचे लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे 'फॅक्टरी' हा चित्रपट स्वतः फैजल खानने दिग्दर्शित केला आहे. फैजलने आपले कमबॅक आणि आमिर खानसोबतच्या बाँडिंगविषयी अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले.

फैजल म्हणाला, 'आमच्या सारं काही आलबेल आहे. मी स्वतःचे निर्णय स्वतः घेतो. मी हा चित्रपट बनवताना आपले बेस्ट दिले आहे. आणि निर्मात्यांनी माझी खूप मदत केली. आता देव आणि प्रेक्षकांच्या निर्णयाची प्रतिक्षा आहे.'

आमिर आणि किरणच्या घटस्फोटावर बोलला फैजल

आमिर आणि किरण रावचा घटस्फोटाची बातमी जेव्हा समोर आली तेव्हा सर्वचजण हैराण झाले होते. या दोघांच्या घटस्फोटाबद्दल तुला काय वाटते असा प्रश्न फैजला विचारला असता तो म्हणाला, 'मी त्यांना काहीच सल्ला देऊ शकत नाही. कारण माझे स्वतःचे लग्न यशस्वी झाले नाही. त्यामुळे मला कुणाच्याही खासगी आयुष्याबद्दल बोलण्याचा हक्क नाही. त्या दोघांना योग्य काय आहे हे चांगले माहिती आहे.'

पुन्हा लग्न करणार का?
फैजलला पुन्हा लग्न करण्याविषयी विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, 'लग्न करणे ही गोष्ट खूप खर्चिक आहे. पुन्हा लग्न करण्याइतके माझ्याकडे पैसे नाहीत. दुर्दैवाने मी अजून इतके पैसे कमावलेले नाही की बायकोचा सांभाळ करू शकेन. माझी कुणीच गर्लफ्रेंड नाही. कारण तिलाही सांभाळणे माझ्या आवाक्याबाहेर आहे. पत्नीला सांभाळणे हे माझ्यादृष्टीने अतिशय महागडी गोष्ट आहे. हा चित्रपट हिट झाला तर मी नक्कीच मुलगी शोधायला सुरुवात करेन.'

आमिर-फैजल 'मेला' मध्ये एकत्र दिसले होते
फैजल आमिरसोबत 'मेला' (2000) चित्रपटात झळकला होता. काही चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर फैजलला इंडस्ट्रीत हव तसं यश मिळवता आले नाही. असे म्हटले जाते की, यामुळे त्याने त्याचे मानसिक संतुलन गमावले आणि एक दिवस घरी कुणाला काहीही न सांगता निघून गेला. मात्र, काही दिवसांनंतर फैजल घरी परतला. परतल्यानंतर त्याने त्याचा भाऊ आमिरवर अनेक आरोप केले होते.

त्याने म्हटले होते की, आमिरने त्याला घरात कैद केले होते. त्याला मानसिक आजार असल्याचे सांगत औषधे घेण्यासही भाग पाडले होते. इतकेच नाही फैजलने आमिरवर त्याची संपत्ती बळकावल्याचा आरोपही केला होता.

बातम्या आणखी आहेत...