आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहा कक्करच्या गाण्यावर फाल्गुनी पाठकची प्रतिक्रिया:म्हणाली – मूळ गाण्यात साधेपणा होता, जो लोकांना आवडला होता

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेहा कक्करचे 'ओ सजना' हे नवीन गाणे 19 सप्टेंबर रोजी रिलीज झाले आहे. हे गाणे 'मैने पायल है छनकाई' गाण्याचे अधिकृत रिमिक्स आहे. 1999 मध्ये रिलीज झालेल्या मूळ गाण्याला फाल्गुनी पाठकने आवाज दिला होता. आता हेच गाणे नेहाने रिमिक्स केल्यानंतर फाल्गुनी पाठकची प्रतिक्रिया समोर आली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, मूळ गाण्यात साधेपणा होता जो लोकांना आवडला.

अलीकडेच एका गाण्याच्या लाँच इव्हेंटमध्ये फाल्गुनी पाठकने ओ सजना या गाण्यावर प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, मी माझ्या सर्व चाहत्यांचे आभार मानू इच्छिते ज्यांना माझे मूळ गाणे आजही आवडत आहे. त्या गाण्यात साधेपणा होता. नेहा कक्करच्या ओ सजना गाण्याचा व्हिडिओ मी अजून पाहिला नाही. मैने पायल है छनकाई या गाण्याप्रमाणेच त्या काळात बनवलेल्या गाण्यांमध्ये, व्हिडिओ, बोल आणि संगीतात साधेपणा असायचा. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कदाचित हीच गोष्ट आहे जी लोक आज मिस करत आहेत. आजकाल गाणी रिमिक्स केली जात आहेत, त्यातली काही खूप चांगली आहेत पण गाणे बनवताना लोकांनी या सर्व गोष्टी लक्षात ठेवयला हव्या. कदाचित त्यामुळेच लोकांना ही गाणी फारशी आवडत नसावीत.

नेहा कक्करच्या 'ओ सजना' या गाण्याला यूट्यूबवर आतापर्यंत 18 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. दुसरीकडे या रिमिक्स गाण्यावर अनेकजण टीका करत आहेत.

1999 साली रिलीज झालेल्या फाल्गुनी पाठकचे 'मैने पायल है छनकाई' हे गाणे यूट्यूबवर आतापर्यंत 351 मिलियन लोकांनी पाहिले आहे. या गाण्यात विवान भटेना, निखिला भटेना आणि अवनी वासा झळकले होते. तर नेहा कक्कर, प्रियांक शर्मा आणि धनश्री वर्मा हे नवीन रिमिक्स गाण्यात दिसत आहेत.

नेहा कक्कर ही रिमिक्स क्वीन आहे

नेहा कक्करने एखादे रिमिक्स गाणे गाण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी नेहाने दिलबर, तू चीज बडी है मस्त, साकी साकी, आशिक बनाया आपने, माही वे, तू कितना अच्छी है, शहर की लडकी, गुर नाल इश्क मीठा यांसारख्या डझनभर गाण्यांना आपला आवाज दिला आहे.