आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेबोला प्रिया मणीचा पाठिंबा:सीतेच्या भूमिकेसाठी करीना कपूरने मागितले होते 12 कोटी, दाक्षिणात्य अभिनेत्री  म्हणाली - त्यात काही चूक नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्री प्रिया मणी गाजलेल्या द फॅमिली मॅन या वेब सीरिजमध्ये झळकली आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान आगामी 'सीता' या चित्रपटात माता सीतेची भूमिका साकारणार असल्याची सध्या जोरदार चर्चा रंगत आहे. इतकेच नाही तर या चित्रपटासाठी करीनाने तब्बल 12 कोटी रुपये मानधन मागितल्याचेही म्हटले जात आहे. मात्र माता सीतेच्या भूमिकेसाठी करीना कपूरचे नाव समोर आल्यानंतर यावरुन मोठा वादंग उठला. चित्रपटात करीनाने माता सीतेची भूमिका वठवली तर त्याला मोठा विरोध केला जाईल असे बजरंग दलाने म्हटले.

दुसरीकडे, करीनाने मागितलेले मानधन तिला देणे शक्य नसल्याने निर्माते आता दुस-या अभिनेत्रीच्या नावाचा विचार करत असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान करीनाला ‘द फॅमिली मॅन’ या गाजलेल्या वेब सीरिजमध्ये झळकलेली दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया मणी हिने पाठिंबा दिला आहे.

करीनाने मागितलेल्या मानधनाविषयी प्रतिक्रिया देताना एका मुलाखतती प्रिया मणी म्हणाली, 'यात काही गैर आहे, असे मला वाटतं नाही. मानधनात असलेल्या फरकाबद्दल बोलायचे झाले तर एक यशस्वी स्त्री ही मागणी करतेय, कारण ती त्यासाठी पात्र असते. फक्त तुम्हाला हे चुकीचे वाटते, याचा अर्थ असा नाही की ती महिला त्या भूमिकेसाठी पात्र नाही. यामुळे तुम्ही त्या महिलेवर कमेंट करू शकत नाही. करीनाने मागितलेले मानधन चुकीचे नाही, कारण ती त्यास पात्र आहे. म्हणूनच तिने मागणी केली आहे,' असे प्रिया म्हणाली आहे.

चित्रपटात रावणाची भूमिका साकारु शकतो रणवीर
अलौकिक देसाई यांचा हा महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट असून चित्रपटाचे लेखक के.व्ही. विजेंद्र प्रसाद आहेत. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटातील रावणाच्या भूमिकेसाठी दिग्दर्शक अलौकिक देसाई यांनी रणवीर सिंहला अप्रोच केले आहे. रणवीरला भूमिका आवडली असल्याचेही सांगितले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...